महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलसाठी जिल्ह्यातून एकमेव उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:28 AM2018-02-13T00:28:11+5:302018-02-13T00:28:28+5:30

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदावर २०१० मध्ये इतिहासात पहिल्यांदाच यवतमाळला अध्यक्षपदाचा मान मिळाला. पुसदचे अ‍ॅड. आशीष देशमुख यांनी गेल्यावेळी अध्यक्षपदी मुसंडी मारली होती.

The only candidate from the district for Maharashtra, Goa Bar Council | महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलसाठी जिल्ह्यातून एकमेव उमेदवार

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलसाठी जिल्ह्यातून एकमेव उमेदवार

Next
ठळक मुद्देआशीष देशमुखांचा अर्ज : पहिल्या संधीचे सोने, आता फेरविजयाचा दावा

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदावर २०१० मध्ये इतिहासात पहिल्यांदाच यवतमाळला अध्यक्षपदाचा मान मिळाला. पुसदचे अ‍ॅड. आशीष देशमुख यांनी गेल्यावेळी अध्यक्षपदी मुसंडी मारली होती. आता २०१८ च्या निवडणुकीतही ते उतरले आहेत. सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा वकिलांची मोठी गर्दी त्यांच्या सोबत होती.
२०१० मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातून दोन उमेदवार होते. त्यात पुसदचे अ‍ॅड. आशीष देशमुख आणि यवतमाळचे अ‍ॅड. गाडबैले यांचा समावेश होता. त्यावेळी देशमुख यांनी विजय पटकावला होता. यंदा २८ मार्च रोजी मतदान होणार जिल्ह्यातून एकमेव उमेदवार देण्यात आला आहे. माजी अध्यक्ष अ‍ॅड. आशीष देशमुख यांना पाठिंब्याचा ठराव जिल्हा बार असोसिएशन, तालुका पातळीवरील वकील मंडळींनी घेतला आहे.
त्यामुळेच सोमवारी अ‍ॅड. आशीष देशमुख यांनी जिल्हा न्यायालयात येऊन अर्ज दाखल केला, त्यावेळी पुसदसह यवतमाळ व इतर तालुक्यातील वकील त्यांच्या सोबत होते. यात अ‍ॅड. चेतन गांधी, अ‍ॅड. निती दवे, अ‍ॅड. राजेंद्र धात्रक, अ‍ॅड. जयंत ठाकरे, अ‍ॅड. मिनहाज मलनस, अ‍ॅड. दर्शन कोठारी, अ‍ॅड. इमरान देशमुख, अ‍ॅड. राजेश साबळे, अ‍ॅड. हेमंत रघाने, अ‍ॅड. पांडुरंग शेंडे, अ‍ॅड. रवी भुमरे, अ‍ॅड. राजेश चव्हाण, अ‍ॅड. भास्कर चव्हाण, अ‍ॅड. दिवाणी, अ‍ॅड. संजय जाऊळकर, अ‍ॅड. सीमा तेलंगे, अ‍ॅड. राधा चिद्दरवार, अ‍ॅड. माने, अ‍ॅड. प्राची निलावार, अ‍ॅड. मंजूषा देव, अ‍ॅड. छाया मुळे, पुसदवरून आलेले अ‍ॅड. माधवराव माने, अ‍ॅड. महामुने, अ‍ॅड.रमेश पाटील, अ‍ॅड. झेड. ओ. भंडारी, अ‍ॅड. अझहर खान, अ‍ॅड. शिंदे, अ‍ॅड. अमित रूढे, अ‍ॅड. उईके आदी यावेळी उपस्थित होते.
गेल्यावेळी मी माझी कौटुंबिक, सामाजिक ओळख सांगत निवडणूक लढविली होती. मात्र आता माझे काम हीच माझी ओळख, असे सांगत निवडणूक लढवित असल्याचे अ‍ॅड. आशीष देशमुख ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.

Web Title: The only candidate from the district for Maharashtra, Goa Bar Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.