३८ लाखांच्या वनघोटाळ्यात केवळ आरोपपत्र

By admin | Published: August 5, 2016 02:28 AM2016-08-05T02:28:08+5:302016-08-05T02:28:08+5:30

वन योजनांमध्ये ३८ लाख रुपयांचा घोटाळा निष्पन्न होऊनही दोन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना केवळ आरोपपत्र देऊन यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने

Only chargesheet in the Rs 38 lakh forestry | ३८ लाखांच्या वनघोटाळ्यात केवळ आरोपपत्र

३८ लाखांच्या वनघोटाळ्यात केवळ आरोपपत्र

Next

दोन आरएफओंचे निलंबन-फौजदारी दूरच : सीसीएफ कार्यालय मेहेरबान, ‘एलएक्यु’नंतरही कारवाई थंडबस्त्यात
यवतमाळ : वन योजनांमध्ये ३८ लाख रुपयांचा घोटाळा निष्पन्न होऊनही दोन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना केवळ आरोपपत्र देऊन यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने कारवाईचा फार्स निर्माण केला आहे. वास्तविक या अधिकाऱ्यांवर निलंबन, फौजदारी या सारखी कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
बी.के. चव्हाण आणि पठाण हे अनुक्रमे वाशिम आणि कारंजा वन परिक्षेत्राचे आरएफओ आहेत. त्यांना यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचे अभय असल्याचे वन वर्तुळात बोलले जाते.
निकृष्ट वनांचे पुनर्ररोपण, वनसंवर्धन, जलसंधारण या कामांमध्ये सन २०१२-१३ ते २०१४-१५ या काळात कारंजा व वाशिम वन परिक्षेत्रात घोटाळा झाला. मूल्यांकन विभाग, दक्षता विभाग आणि वन अभियंत्यांच्या चौकशीत घोटाळा निष्पन्न झाला. कारंजामध्ये १७ लाख ९९ हजार तर वाशिममध्ये १९ लाख ६० हजार ६४४ रुपयांचा घोटाळा सिद्ध झाला. त्यामुळे कारंजा व वाशिमच्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांवर निलंबन, फौजदारी कारवाई बंधनकारक होती. परंतु यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने या कठोर कारवाईला बगल देऊन दोनही आरएफओंना केवळ कलम ८ अन्वये १९ एप्रिल २०१६ रोजी आरोपपत्र देऊन त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली. या माध्यमातून या घोटाळेबाज आरएफओंना सीसीएफ कार्यालयाने जणू सुरक्षा प्रदान केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान कारंजा व वाशिम वन परिक्षेत्रातील सुमारे ३८ लाखांच्या घोटाळ्याच्या निमित्ताने मूर्तीजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न (क्र.६२२८१) उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना या प्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू असल्याचे सांगितले गेले. घोटाळा सिद्ध होऊनही सीसीएफ कार्यालय या दोनही आरएफओंविरोधात निलंबन, फौजदारी कारवाई करण्यास चालढकल करीत असल्याने त्यांना सीसीएफचे तर अभय नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. एलएक्यूच्या काळात हे दोनही आरएफओ मुंबईत तळ ठोकून होते. त्यांनी यातील तक्रारकर्त्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

पुसद वनपरिक्षेत्रातील कारभारही वादग्रस्तच
बी.के. चव्हाण हे पुसदला आरएफओ राहिले आहेत. तेव्हापासून त्यांना वरिष्ठ आयएफएसचे अभय असल्याचे सांगितले जाते. पुसदला असताना चव्हाण यांच्या कार्यक्षेत्रात पाणलोटच्या कामात मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. खंडाळा, येलदरी येथील अवैध वृक्षतोड गाजली होती. त्याप्रकरणात वनरक्षकाला निलंबितही करण्यात आले होते. बी.के. चव्हाण यांची पुसदवरुन वाशिमला वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून बदली झाली. मात्र तेथे पुसदपेक्षाही मोठा घोटाळा उघडकीस आला.

 

Web Title: Only chargesheet in the Rs 38 lakh forestry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.