निळोणा प्रकल्पात केवळ नऊ टक्के पाणीसाठा

By Admin | Published: March 28, 2016 02:24 AM2016-03-28T02:24:09+5:302016-03-28T02:24:09+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात नऊ टक्के तर चापडोह प्रकल्पात ५३ टक्के पाणी शिल्लक आहे.

Only nine percent of water stock in the Nilona project | निळोणा प्रकल्पात केवळ नऊ टक्के पाणीसाठा

निळोणा प्रकल्पात केवळ नऊ टक्के पाणीसाठा

googlenewsNext

यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात नऊ टक्के तर चापडोह प्रकल्पात ५३ टक्के पाणी शिल्लक आहे. निळोण्याचे पाणी ३० एप्रिलपर्यंत पुरणार आहे. मेपासून इमर्जन्सी पम्पिंग करावे लागणार आहे. यामुळे यवतमाळकरांना सध्या जपून पाणी वापरावे लागणार आहे. दोन दिवसा आड होणारा पाणीपुरवठा लांबणार आहे.
शहरासह लगतच्या गावांना जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करते. प्राधिकरणावरच सर्वसामान्यांचे पाण्याचे गणित अवलंबून आहे. गतवर्षी पावसाळ्यापूर्वीच प्रयासच्या माध्यमातून गाळ काढण्यात आला होता. निळोणा जलाशय ओव्हरफ्लो झाले होते. या जलाशयातील पाणी अधिक काळ टिकेल, अशी अपेक्षा होती. मात्र, नागरिकांचा भार वाढल्याने जलशयाने लवकरच तळ गाठला आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने पाण्याची पातळी झपाट्याने घसरत आहे.
सध्या जलाशयामध्ये ३० एप्रिलपर्यंत पुरू शकेल इतकेच ९ टक्के पाणी शिल्लक आहे. यानंतर इमर्जन्सी पम्पिंग करावी लागणार आहे. गत तीन चार वर्षांत प्रथमच अशा स्वरूपाचे पाऊल प्राधिकरणाला उचलावे लागणार आहे. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल होणार आहे.
निळोण्यापेक्षा अधिक जलसाठा चापडोह प्रकल्पात शिल्लक आहे. या ठिकाणी ५३ टक्के साठा आहे. यामुळे पुढील काळात यवतमाळच्या पाणीपुरवठ्याची भिस्त चापडोहवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)

चार कोटींची थकबाकी
४जीवन प्राधिकरणाला थकीत ग्राहकांकडून ११ कोटींची वसुली करायची होती. प्रत्यक्षात सात कोटींची वसुली झाली. चार कोटींची थकबाकी अद्यापही कायम आहे. यामुळे भविष्यात पाण्याच्या कर वसुलीची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Only nine percent of water stock in the Nilona project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.