कलगाव येथे महिन्यातून दोनदाच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:10 AM2019-03-09T00:10:43+5:302019-03-09T00:11:23+5:30

तालुक्यातील कलगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिन्यातून केवळ दोनदाच पाणी येत आहे. डिसेंबर महिना संपताच गावात पाणीटंचाईने कहर केला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली.

Only two times a month in Kalaaon | कलगाव येथे महिन्यातून दोनदाच पाणी

कलगाव येथे महिन्यातून दोनदाच पाणी

Next
ठळक मुद्देमहिलांची परवड : जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई, मार्चमध्येच महिलांची पाण्यासाठी पायपीट झाली सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यातील कलगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिन्यातून केवळ दोनदाच पाणी येत आहे. डिसेंबर महिना संपताच गावात पाणीटंचाईने कहर केला आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली. अनेक गावांमध्ये विहिरी कोरड्या पडल्याने नळाला पाणी येणे दुरापास्त झाले आहे. जानेवारी महिन्यापासूनच काही गावात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. यामुळे महिला व ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. एक-दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. रात्री-अपरात्री महिलांची पायपीट सुरू आहे.
कलगाव येथे पाणीटंचाईने आताच कहर केला आहे. जानेवारी महिन्यापासून गावातील नळाला महिन्यातून दोनदाच पाणी येत आहे. पाणीपुरवठा करणारी विहीर जानेवारीतच पाणीपातळी खालावली आहे. डिसेंबरपर्यंत चार-पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. मात्र जानेवारी सुरू होताच महिन्यातून दोनदाच पाणीपुरवठा होत आहे. फेब्रुवारीत केवळ एक तासातच विहिरीचे पाणी संपत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
दरवर्षी तालुकास्तरावर पाणीटंचाई आढावा बैठक घेतली जाते. मात्र कलगाव येथील पाणीटंचाईवर चर्चा होऊनही उपाययोजना केल्या जात नाही. ग्रामपंचायत यात कमी पडत आहे. कलगाव येथे पेयजल योजनेंतर्गत नवीन विहीर मंजूर झाली.
यापूर्वी भारत निर्माण योजनेतून विहीर तयार करण्यात आली होती. मात्र ही विहीर जानेवारीतच उपस्यावर येते. त्यामुळे गावात पाणीटंचाई कायम आहे.

Web Title: Only two times a month in Kalaaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.