पुसदमध्ये जमावबंदीला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:00 AM2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:23+5:30

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने जगाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. नंतर २३ मार्चपासून जिल्हाधिकाºयांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी हा आदेश संपूर्ण राज्यातच लागू करण्यात आला. मात्र येथील नागरिकांनी या आदेशाला अक्षरश: धाब्यावर बसविल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर मुक्तसंचार करीत होते.

Open the mob in Pusad | पुसदमध्ये जमावबंदीला खो

पुसदमध्ये जमावबंदीला खो

Next
ठळक मुद्देमुक्त संचार : वाहनांची गर्दी वाढली, चौकाचौकात नागरिकांचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : कोरोना प्रतिबंधासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच यंत्रणा सतर्क आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. मात्र शहरात नागरिकांनी जमावबंदी आदेशाला खो दिल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने जगाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. नंतर २३ मार्चपासून जिल्हाधिकाºयांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी हा आदेश संपूर्ण राज्यातच लागू करण्यात आला. मात्र येथील नागरिकांनी या आदेशाला अक्षरश: धाब्यावर बसविल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर मुक्तसंचार करीत होते.
शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहने बिनबोभाटपणे धावत होती. महात्मा गांधी चौक, महात्मा फुले चौक, बसस्थानक परिसर, श्रीरामपूर व इटावा वॉर्ड परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. जिल्हाधिकाºयांनी ही गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केले. त्याचे नागरिकांनी सर्रास उल्लंघन केल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकाºयांनी ३१ मार्चपर्यंत गरज नसेल तर घरातच बसून राहण्याचे आवाहन केले. त्या दृष्टीने आरोग्य विभाग जनजागृती करीत आहे. मात्र नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याचे सोमवारी दिसून आले. अनेकांनी घरातच राहण्याऐवजी रस्त्यांवर फेरफटका मारला. वाहनांचीही गर्दी झाली होती.

कठोर कारवाईची ठाणेदारांची तंबी
जिल्ह्यात कलम १४४ लागू आहे. त्यानुसार नागरिकांना एकत्र येण्यासह वाहनांची गर्दी करण्यावर पूर्णत: बंदी आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. अन्यथा त्यांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी तंबी शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी दिली. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºयावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आत्राम यांनी दिला. तथापि, ग्रामीण भागात अद्यापही व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात अद्यापही नागरिकांना कोरोनाबाबत आवश्यक तेवढी माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे गावागावात याबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.

Web Title: Open the mob in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.