‘डिंक्या’मुळे संत्रा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:16 PM2017-11-15T22:16:53+5:302017-11-15T22:18:47+5:30

एकीकडे गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशीची वाताहत झालेली असताना दुसरीकडे संत्रा पिकांवर डिंक्या रोगाने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे.

Orange Danger in 'Dinkya' | ‘डिंक्या’मुळे संत्रा धोक्यात

‘डिंक्या’मुळे संत्रा धोक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देबागा वाळण्याचा धोका : गुलाबी बोंडअळीनंतर पुन्हा एक धक्का

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : एकीकडे गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशीची वाताहत झालेली असताना दुसरीकडे संत्रा पिकांवर डिंक्या रोगाने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये कमालीचे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी संत्राचे पीक पाहिजे तसे आलेले नाही. बहर मोठ्या प्रमाणात आला परंतु अनेक झाडांना फळधारणाच झालेली नाही. त्यातल्या त्यात डिंक्या रोगाने झाडेच पोखरायला सुरुवात केली आहे. बहुतांश फळ असलेली झाडेच डिंंक्या रोगाच्या आक्रमणाला बळी पडली आहे. त्यामुळे फळे मोठ्या प्रमाणात गळली. तर दुसरीकडे लागलेली फळे पूर्णत: भरलेली नाही. फळांमधील गोडवाही कमी झाल्याचे स्पष्ट होते.
गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे बोंड वरुन चांगले दिसत असले तरी आतून संपूर्ण खराब केलेले असते. प्लॉटच्या-प्लॉट गुलाबी बोंडअळीमुळे नष्ट झाले आहे. तशीच स्थिती डिंक्या रोगामुळे संत्रा झाडाची तर होणार नाही ना, अशी भिती शेतकरी वर्गात आहे. हा रोग म्हणजे झाडांच्या बुंदाला छीद्र पडतात. या छिद्रातून चिकट द्रव्य बाहेर पडतो. झाडांची पाने सुकायला लागतात. झाड निस्तेज दिसते. त्यामुळे या रोगाला अटकाव करण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा शेतकरी वर्ग देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये
यावर्षी डिंक्या रोगाने मोठे आक्रमण केलेले आहे. फळ आणि बार मोठ्या प्रमाणात गळाला. झाडेही निस्तेज पडायला लागली. उत्पन्नही घटले - चंद्रशेखर चांदोरे, शेतकरी, कळंब

डिंक्या रोगाचा संसर्ग झाडाच्या खोडाला पाणी लागले तर होतो. हा रोग होऊच नये म्हणून अनेक उपाययोजना आहेत. परंतु शेतकरी त्यांची नियमित अंमलबजावणी करण्यामध्ये कमी पडतो. काही प्रमाणात दुर्लक्षही झाडांच्या मुळाशी येऊ शकते. शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता कृषी विभागाशी संपर्क साधावा आणि योग्य मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी किशोर अंबरकर यांनी दिली.

Web Title: Orange Danger in 'Dinkya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.