‘आम आदमी’ला भरपाईचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:23 PM2019-01-21T22:23:08+5:302019-01-21T22:23:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अपघाती मृत्यू झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट दाखल करूनही ‘आम आदमी’ चा दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला ...

Order for compensation to 'Aam aadmi' | ‘आम आदमी’ला भरपाईचा आदेश

‘आम आदमी’ला भरपाईचा आदेश

Next
ठळक मुद्देरिपोर्टवर अडले : खडकीतील महिलेला मंचचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अपघाती मृत्यू झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट दाखल करूनही ‘आम आदमी’ चा दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला जिल्हा ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. राळेगाव तालुक्याच्या खडकी येथील शारदाबाई नामदेवराव आत्राम या शेतकरी महिलेला नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश मंचाने दिला आहे.
राळेगाव तहसील कार्यालयामार्फत भारतीय आयुर्विमा महामंडळ अमरावतीकडे शेतकºयांचा ‘आम आदमी’ योजने अंतर्गत विमा काढण्यात आला आहे. शारदाबाई आत्राम यांचे पती नामदेवराव आत्राम यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. त्यांनी ‘आम आदमी’ विमा योजनेच्या लाभासाठी विमा कंपनीच्या अमरावती विभागीय कार्यालयाकडे अर्ज दाखल केला. मात्र त्यांनी लाभ नाकारला.
अपघाती मृत्यू झाल्यास सदर योजने अंतर्गत ७५ हजार रुपये भरपाई मिळायला पाहिजे होती. विमा कंपनीने मात्र केमिकल अ‍ॅनॉलिसीस रिपोर्ट सादर केला नसल्याच्या कारणावरून भरपाई नाकारली. याविरोधात शारदाबाई आत्राम यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तक्रारीवर युक्तीवादा दरम्यान शारदाबाई आत्राम यांनी केमिकल अ‍ॅनॉलिसीस रिपोर्ट सादर केला नसल्याचे कंपनीने सांगितले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नामदेवराव आत्राम यांचा मृत्यू अपघाती झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा वेळी केमिकल अ‍ॅनॉलिसीस रिपोर्टची आवश्यकता नाही. या निर्णयावर मंच पोहोचले. विमा कंपनीने जाणिवपूर्र्वक भरपाई नाकारली हे स्पष्ट होत असल्याचे निकालात म्हटले आहे. विमा कंपनीने शारदाबाई आत्राम यांना विमा दाव्याची रक्कम रुपये ७५ हजार, शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार आणि तक्रार खर्च म्हणून तीन हजार रुपये द्यावा, असा आदेश दिला आहे.

Web Title: Order for compensation to 'Aam aadmi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.