रस्ता व नाली कामाच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: July 7, 2014 12:10 AM2014-07-07T00:10:03+5:302014-07-07T00:10:03+5:30
धोत्रा येथे विविध योजनेतून सिमेंट रस्ता आणि नालीचे बांधकाम करण्यात आले. सदर काम प्राकलनानुसार झाले नसल्याने या कामाचा दर्जा अतिशय खालावला आहे. या कामांची चौकशी करण्याचे
कळंब : धोत्रा येथे विविध योजनेतून सिमेंट रस्ता आणि नालीचे बांधकाम करण्यात आले. सदर काम प्राकलनानुसार झाले नसल्याने या कामाचा दर्जा अतिशय खालावला आहे. या कामांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिले आहे.
दरम्यान, या कामांची जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस.एस. तपासे, बांधकाम उपविभाग कळंबचे उपअभियंता शरद राघमवार, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, शाखा अभियंता विलास चावरे आणि पंचायत समितीचे शाखा अभियंता तुषार परळीकर यांनी पाहणी केली. त्यांना या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आला.
गजानन दिघडे ते चिंतामण वाटकर यांच्या घरापर्यंत झालेल्या सिमेंट रस्त्याची जाडी प्राकलनानुसार नाही, गजाचा अत्यल्प वापर, नाली बांधकाम व्यवस्थित आढळून आले नाही. कानीफनाथनगर वार्ड क्रमांक ३ सरोदीपुरा येथे झालेल्या नालीमध्ये सांडपाणी सोडण्यासाठी
कुठलीही व्यवस्था केली नाही. नालीचा उतार योग्य नसल्याचे चौकशीत आढळून आले.
विशेष म्हणजे या कामांसाठी जवळपास १० लाख रूपये खर्च करण्यात आले.
ग्रामपंचायतीमार्फत पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्द योजना, गाव तंटामुक्तीसाठी मिळालेला निधी, दलितवस्ती सुधार योजना, तांडावस्ती सुधार योजना आणि बीआरजीएफ अंतर्गत मिळालेला निधी केवळ नाली व सिमेंट रस्त्यावर खर्च करण्यात आला.
सदर कामाची पाहणी केल्यानंतर अनियमितता आढळून आली. याची दखल घेत संबंधित यंत्रणेला लेखी जबाब मागू. काम
व्यवस्थित करण्यासाठी सुचित केले जाईल, असे जिल्हा परिषद बांधकाम विभाग कळंबचे उपअभियंता शरद राघमवार यांनी सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)