सखी मंचच्यावतीने जोश-२०१६ चे आयोजन

By admin | Published: January 2, 2016 08:37 AM2016-01-02T08:37:04+5:302016-01-02T08:37:04+5:30

सखी वर्षभर ज्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत असतात त्या सखी मंचच्या ‘जोश’ कार्यक्रमाचे आयोजन ७

Organizing Josh-2013 for Sakhi Forum | सखी मंचच्यावतीने जोश-२०१६ चे आयोजन

सखी मंचच्यावतीने जोश-२०१६ चे आयोजन

Next

 यवतमाळ : सखी वर्षभर ज्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत असतात त्या सखी मंचच्या ‘जोश’ कार्यक्रमाचे आयोजन ७ आणि ८ जानेवारी २०१६ रोजी येथील दर्डा मातोश्री सभागृहात करण्यात येत आहे. दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी विविध स्पर्धा आयोजित आहे. लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने जोश-२०१६ अंतर्गत पहिल्या दिवशी ७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजतापासून विविध स्पर्धांना प्रारंभ होणार आहे.
भुली बिसरी यादे
जोश अंतर्गत दुपारी १ वाजता भुली बिसरी यादे या गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत केवळ जुन्या हिंदी चित्रपटातील १९८० पर्यंतचे गीत सादर करावे लागतील. स्पर्धकाला गाणे सादर करण्यासाठी दोन मिनिटाचा वेळ देण्यात येईल. स्पर्धेच्या ठिकाणी कुठलेही वाद्य राहणार नाही. गाणे पाहून किंवा मुकपाठ म्हणता येईल. सूर, ताल, लय, हावभाव आणि गीताचे बोल यावर गुण दिले जातील. प्रकल्प अधिकारी म्हणून राखी खत्री (९८२३९०५६००), प्रगती धुर्वे (९८२३४१७५५१) काम पाहत आहे.
जरा चखकर देखो
मटरचे नमकीन व्यंजन स्पर्धा ‘जरा चखकर देखो’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी व्यंजन घरुन करून आणावे लागतील. पदार्थांमध्ये मटरचा वापर जास्तीत जास्त असाव. सजावटीसाठी दहा मिनिटांचा वेळ दिला जाईल. सजावटीसाठी केवळ खाद्य पदार्थांचाच वापर करता येईल. या स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य घरुन आणावे लागतील. स्वाद, निटनेटकेपणा, डेकोरेशन, नाविन्य पूर्णत: यावर गुण दिले जातील. प्रकल्प अधिकारी म्हणून कविता लढ्ढा (९५०३५३२९९९), दीपा लिंगावार (९६७३८०१८१५) काम पाहत आहे.
ओटी सजावो स्पर्धा
सखी मंचच्यावतीने ओटी सजावो ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून वधू मुलीची ओटी सजवायची आहे. ओटी घरुन सजवून आणावी लागेल. सजावटीसाठी १० मिनिटांचा वेळ देण्यात येईल. ओटीमध्ये मखाणे, बत्ताशा, ड्रायफूट, तांदूळ, हळकुंड, सुपारी, खारीक आदी साहित्याचा वापर करावा लागेल. साज-सज्जा, निटनेटकेपणा यावर गुण दिले जातील. प्रकल्प अधिकारी म्हणून नीलिमा शर्मा (८७९३४५३७०९), जयश्री तांबोळी (९४२१४८४५५४) काम पाहत आहे.
भाषण स्पर्धा
जोश स्पर्धेअंतर्गत भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ‘मोबाईल संस्कृतीचा मुलांवर होणारा परिणाम’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेसाठी दोन मिनिटांचा वेळ देण्यात येईल. स्पर्धकाची स्टेज डेअरिंग, बोलण्याचे लकब आणि सादरीकरण यावर गुण दिले जातील. या स्पर्धेसाठी प्रकल्प अधिकारी म्हणून शुभदा हातगावकर (९८९०७७९४३४), स्मिता गंधे (८८८८४८४५७०) काम पाहत आहे.
रांगोळी स्पर्धा
सखींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून निसर्ग, बेटी बचाव, दहशतवाद या विषयावर सखींना रांगोळी साकारावयाची आहे. स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य घरुन आणावे. स्पर्धा स्थळी दोन बाय दोन फुटाची जागा रांगोळी साकारण्यासाठी देण्यात येईल.
रांगोळी काढण्यासाठी ४० मिनिटांचा वेळ देण्यात येईल. काच, मोती या सारख्या अतिरिक्त वस्तूंचा वापर करता येईल. विषयाची मांडणी, निटनेटकेपणा आणि कलात्मकता यावर गुण देण्यात येईल. प्रकल्प अधिकारी म्हणून माणिक भोयर (९४०५१६४३८९), स्मिता नागदिवे (९४२०२४६६०१) काम पाहत आहे.
वेशभूषा स्पर्धा
जैसा देश वैसा भेस या थिमवर वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांना राजस्थानी, मारवाडी, मराठी, गुजराती, वेस्टर्न आदी वेशभूषा साकारता येईल. ज्या वेशभूषेत असाल त्याच भाषेत बोलणे आवश्यक आहे. आत्मविश्वास, साज-सज्जा, बोलणे यावर गुण दिले जातील. प्रत्येक स्पर्धकाला एक मिनिटाचा वेळ देण्यात येईल. प्रकल्प अधिकारी म्हणून नलिनी हांडे (८६०५४४१४१६), पुष्पा पारसकर (९५०३४४१८६२) काम पाहत आहेत. यानंतर हौजी गेमचे आयोजन सखींसाठी करण्यात आले आहे. वरील सर्व स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पुरस्कार दिले जातील. या स्पर्धा केवळ सखी मंच सदस्यांसाठी असून नवीन वर्षात सदस्य झालेल्या सखीही यात सहभागी होऊ शकतात. सखी मंचच्या जोश स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केले आहे. (उपक्रम प्रतिनिधी)

‘जरा नच के दिखा’ स्पर्धा
४जोश अंतर्गत सायंकाळी ६.३० वाजता जरा नच के दिखा ही एकलनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन गटात असून पहिला गट १८ ते ३० वयोगटासाठी तर दुसरा गट ३० च्यावर वयोगटासाठी राहणार आहे. हिंदी फिल्मी गाण्यांवर नृत्य सादर करावे लागेल. नवीन-जुने कोणतेही गाणे चालेल. गाण्याची सिडी घरुन आणावी लागेल. स्पर्धकांना घरुन तयार होऊन यावे लागेल. रुमाल, छत्री, दोरी, काठी या पैकी एका वस्तूचा प्रॉप म्हणून वापर आवश्यक करावा लागेल. नृत्य सादरीकरण आणि वेशभूषा यावर गुण देण्यात येईल. या स्पर्धेत प्रथम बक्षीस १५०० रुपये, द्वितीय १,००० रुपये आणि तृतीय बक्षीस ७०० रुपये दोनही गटांना दिले जातील. प्रकल्प अधिकारी म्हणून छाया राठोड (७५०७६३०१७०), अलका राऊत (९९२२६६१४८७), सुनीता भोयर (७२१८२४०४३९), निलिमा मंत्री (९४०३४५४६९७) काम पाहत आहे.

Web Title: Organizing Josh-2013 for Sakhi Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.