उमरखेड तालुक्यात साथ रोगाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:40 AM2021-04-15T04:40:12+5:302021-04-15T04:40:12+5:30
आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्रिय करून दहशत खालील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या ...
आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्रिय करून दहशत खालील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे जनता भयभीत असताना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, ऊन लागणे, अंगदुखी अशा आजारांचे प्रमाण वाढत आहे.
मरसूळ, बेलखेड, पळशी, आमदरी आदी गावांसह अन्य खेडे गावात साथ वाढले आहे. कोरोनाची दहशत खेड्यापाड्यात पोहोचली असताना सर्दी, खोकला, ताप आल्यास तो व्यक्ती कोरोना संशयित म्हणून समजला जातो. त्याला शासकीय कोविड सेंटरला पोहोचविले जाते, असा गैरसमज होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये एकच गर्दी करीत आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्रिय करावी, अशी मागणी प्रत्येक गावच्या सरपंच व नागरिकांकडून होत आहे.
बाॅक्स
दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका
कधी जास्त प्रमाणात उन्ह, तर अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे गावागावात पाणीपुरवठा विभागाकडून पाईपलाईन टाकण्यात आल्या आहे. मात्र, ठिकठिकाणी फुटक्या पाईपलाईनमध्ये घाण तयार होते. दूषित पाणी प्राशन केल्याने मळमळणे, ताप, डोकेदुखी आदी आजार वाढत आहे. हा प्रकार खेडे गावात वाढत आहे.