तणावमुक्तीवर मैदानी खेळ रामबाण उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:01 PM2019-01-31T22:01:58+5:302019-01-31T22:02:13+5:30
धकाधकीच्या जीवनात अनेकांना तणावाने ग्रासलेले असते. या तणावमुक्तीवर मैदानी खेळ हे रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले. येथील पोलीस कवायत मैदानावर गुरुवारपासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व आनंद महोत्सवाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : धकाधकीच्या जीवनात अनेकांना तणावाने ग्रासलेले असते. या तणावमुक्तीवर मैदानी खेळ हे रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले.
येथील पोलीस कवायत मैदानावर गुरुवारपासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व आनंद महोत्सवाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. कर्मचाऱ्यांना वर्षभर कामे असतात. त्या कामांचा ताण कमी करून तणावमुक्ती मिळविण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांमध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडू व कलाकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रतिभावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम जिल्हा परिषदेने केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सेवानिवृत्त व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार माधुरी आडे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर रक्तदान शिबिरही घेण्यात आले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.बी. पाटील, कॅफो चंद्रशेखर खंडारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण आदी उपस्थित होते. संचालन कैलास राऊत, तर आभार डॉ. दिलीप चौधरी यांनी मानले. सुभाष धवसे, हरिभाऊ राऊत, संदीप शिवरामवार आदींनी सहकार्य केले.