पाचशेवर अतिक्रमण ध्वस्त

By admin | Published: April 26, 2017 12:15 AM2017-04-26T00:15:12+5:302017-04-26T00:15:12+5:30

नगरपरिषदेने अतिक्रमणाच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून गत दोन दिवसात शहरातील तब्बल पाचशेच्यावर

Over 500 encroachments destroyed | पाचशेवर अतिक्रमण ध्वस्त

पाचशेवर अतिक्रमण ध्वस्त

Next

मुख्य बाजारपेठेत बुलडोजर : पुसद नगरपरिषदेच्या कारवाईने धाबे दणाणले
पुसद : नगरपरिषदेने अतिक्रमणाच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून गत दोन दिवसात शहरातील तब्बल पाचशेच्यावर अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. मंगळवारी शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड लाईनमधील अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.
पुसद शहरात गत कित्येक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडत होती. यावर उपाय म्हणून नगरपरिषदेने सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. गेल्या कित्येक वर्षानंतर ही धडक मोहीम शहरात सोमवारपासून राबविली जात आहे. सोमवारी तहसील कार्यालय परिसर, महात्मा फुले चौक, कारला रोड, बसस्थानक परिसरात, छत्रपती शिवाजी चौक आदी ठिकाणचे २५० अतिक्रमणे हटविण्यात आली.
मंगळवारी सकाळी १० वाजता पुन्हा या मोहिमेला प्रारंभ झाला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार संजय गरकल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रवींद्र मालवत, जुगल जाधव यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, ठाणेदार वाघु खिल्लारे, प्रकाश शेळके यांच्या उपस्थितीत अतिक्रमणावर बुलडोजर चालविणे सुरू झाले. शहरातील महात्मा गांधी चौक, लोकहित विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, छत्रपती शिवाजी चौक, कापड लाईन, नगिना चौक, आझाद चौक आदी भागातील अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. दुसऱ्या दिवशी तब्बल ३०० अतिक्रमण काढण्यात आली. या कारवाईत अभियंता एस.एस. जहागीरदार, शिवकांत पांडे, आरोग्य विभागाचे सुभाष राठोड, जय उंटवाल, नटवर उंटवाल, किरण आत्राम, सुभाष पवार, दिनेश राठोड आदी सहभागी झाले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. (प्रतिनिधी)

तीन बुलडोजर १२० कर्मचारी

पुसद शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत नगरपरिषदेचे तीन बुलडोजर, दोन मेटॅडोअर, तीन ट्रॅक्टर, अग्नीशमन बंब यांच्यासह आरोग्य विभागाचे १२० कर्मचारी सहभागी झाले आहे. शहरात हा ताफा निघतो तेव्हा अतिक्रमणधारकांमध्ये चांगलीच धडकी भरते. अनेक जण स्वत:हून अतिक्रमण काढण्यासाठी पुढे येत आहे.

 

Web Title: Over 500 encroachments destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.