कोरोनावर दोन दिवसांत दोन हजार रुग्णांची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 05:00 AM2021-05-03T05:00:00+5:302021-05-03T05:00:07+5:30

सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा हजार ४९१ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. या पैकी दोन हजार ४९८ रुग्ण विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार घेत असून तीन हजार ९९३ जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्यांची संख्या ५४ हजार ७६० झाली आहे. तर कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ४६ हजार ९४३ इतकी आहे.

Over two thousand patients in two days on the corona | कोरोनावर दोन दिवसांत दोन हजार रुग्णांची मात

कोरोनावर दोन दिवसांत दोन हजार रुग्णांची मात

Next
ठळक मुद्दे४९ जणांचा मृत्यू : ॲक्टिव्ह साडेसहा हजार, ४७ हजार कोराेनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी व रविवारी एकंदर दोन हजार ११० जण कोरोनामुक्त झाले तर या दोन दिवसात १७४९ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. शिवाय शनिवारी २४ आणि रविवारी २५ अशा ४९ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.  
सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा हजार ४९१ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. या पैकी दोन हजार ४९८ रुग्ण विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार घेत असून तीन हजार ९९३ जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्यांची संख्या ५४ हजार ७६० झाली आहे. तर कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ४६ हजार ९४३ इतकी आहे. या दरम्यान जिल्ह्यात १३२६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. सद्यस्थितीत जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटिव्हिटी दर १२.७५ इतका आहे. तर कोरोना मृत्यूदर २.४२ इतका झाला आहे. 
जिल्ह्यात शनिवारी ९८१ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यात ६२७ पुरुष व ३५४ महिला आहेत. त्यात यवतमाळ येथील २०६, वणी १२३, पुसद ११२, पांढरकवडा १०२, घाटंजी ८२, दारव्हा ६३, आर्णी ६१, बाभूळगाव ४८, झरी ४५, नेर ३१, दिग्रस २५, राळेगाव २२, मारेगाव १९, कळंब १२, उमरखेड ७, महागाव ५ आणि अन्य शहरातील १८ रुग्णांचा समावेश आहे. 
तसेच रविवारी ७६८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यात ४७९ पुरुष व २८९ महिला आहे. यवतमाळ येथील १४२, घाटंजी ११८, उमरखेड १०७, पांढरकवडा ७२, वणी ६३, मारेगाव ५६, कळंब ४३, महागाव ३४, दारव्हा ३०, पुसद २६, नेर २५, झरी २०, बाभूळगाव १५, राळेगाव ६, दिग्रस ५, आर्णी ३ आणि अन्य शहरातील तीन रुग्णांचा त्यात समावेश आहे. 
जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत ४ लाख २९ हजार ४७१ नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ४ लाख २२ हजार १३३ अहवाल प्राप्त झाले. तसेच ३ लाख ६७ हजार ३७३ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप सात हजार ३३८ अहवालांची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. 

  रविवारी गेलेले २५ बळी 
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय :  यवतमाळ शहरातील ३७, ६५ वर्षीय पुरुष, ५९, ६३ वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ६४, ६६ वर्षीय पुरुष, वणी येथील ८१, ४३, ४५ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ५८ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ३० वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, आर्णी येथील ६७ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ५९ वर्षीय महिला, दिग्रस येथील ३५ वर्षीय महिला, माहूर येथील ७० वर्षीय पुरुष आणि धामणगाव येथील ५६ वर्षीय पुरुष.
- डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर :  वणी येथील ६० वर्षीय महिला, तालुक्यातील ७७ वर्षीय पुरुष, उमरखेड येथील ६३ वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील ४५ वर्षीय पुरुष व ८० वर्षीय महिला, राळेगाव येथील ५५ वर्षीय पुरुष. 
- खासगी रुग्णालय : वणी येथील ५० वर्षीय पुरुष आणि पुसद येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. 
 

 शनिवारी गेलेले २४ बळी 
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय : यवतमाळ शहरातील ४०, ५२, ६४, ६३ वर्षीय पुरुष आणि ३१ वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ६६ वर्षीय पुरुष व ७० वर्षीय महिला, नेर येथील ६५ वर्षीय महिला, तालुक्यातील ३५ वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिला, पांढरकवडा येथील ५६ वर्षीय पुरुष, बाभूळगाव येथील ४८ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ६८ वर्षीय पुरुष, वणी येथील ३२ वर्षीय पुरुष व ३५ वर्षीय महिला, तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष व ७० वर्षीय महिला, मारेगाव येथील ७० वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील ४० वर्षीय पुरुष, आर्णी येथील ६५ वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील ७८ वर्षीय पुरुष आणि माहूर जि. नांदेड येथील ६५ वर्षीय महिला. 
- डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर :  पांढरकवडा तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. 
- खासगी रुग्णालय :  ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू. 

 

Web Title: Over two thousand patients in two days on the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.