दिग्रसमध्ये कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:35 AM2021-05-03T04:35:36+5:302021-05-03T04:35:36+5:30
घरगुती उपचार घेणारे व ज्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होतो, ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९० पेक्षा खाली जात आहे, ...
घरगुती उपचार घेणारे व ज्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होतो, ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९० पेक्षा खाली जात आहे, अशा रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होईपर्यंत हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर फायद्याचे ठरणार आहेत. कोविडमध्ये अनेक रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक खाली जाऊन तो रुग्ण गंभीर होतो. अशा रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास, त्यांच्या शरीरातील कार्यप्रणालीवर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यांना याचा लाभ होणार आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढल्याने, रुग्णालयातही ऑक्सिजन बेड लवकर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णाची स्थिती खालावते व अनेक रुग्ण उशिरा वैद्यकीय मदत व ऑक्सिजन मिळाल्याने दगावतात. ही बाब आमदार संजय राठोड यांच्या लक्षात येताच, त्यांनी स्वखर्चातून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर तालुक्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.
बॉक्स
गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन
ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मिळविण्यासाठी व कोविडबाबत रुग्णांना मदत मिळवून देण्याकरिता येथील आमदार राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख उत्तम ठवकर, उपनगराध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अतिश राठोड, डॉ.विष्णू उकंडे, विनोद जाधव, केतन रत्नपाखी, विणू दुधे, संजय चोपडे, अमोल राठोड, यादव गावंडे आदींनी केले आहे.