दिग्रसमध्ये ऑक्सिजन पातळी तपासणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:44 AM2021-05-06T04:44:21+5:302021-05-06T04:44:21+5:30
दिग्रस : कोरोना महामारीच्या काळात शिवसेना आमदार संजय राठोड ‘शिवसेना आपल्या सेवेसाठी’ या मोहिमेअंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहेत. त्याचाच ...
दिग्रस : कोरोना महामारीच्या काळात शिवसेना आमदार संजय राठोड ‘शिवसेना आपल्या सेवेसाठी’ या मोहिमेअंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ऑक्सिजन पातळी तपासणी मोहीम राबविली जात आहे.
शिवसेनेचे स्वयंसेवक बाजारातील प्रत्येक ठिकाणी जाऊन तपासणी करीत आहेत. कोविडमध्ये अनेक रुग्ण उशिरा वैद्यकीय मदत व ऑक्सिजन मिळाल्याने दगावत आहेत. ही बाब आमदार संजय राठोड यांच्या लक्षात आली. त्यांनी अशा रुग्णांसाठी स्वखर्चातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिग्रस शहरात उपलब्ध करून दिले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गरजू रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे. अनेक रुग्णांना त्याचा लाभ होत आहे.
नागरिकांचे स्वतःच्या शरीरातील ऑक्सिजन पातळीकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांची प्रकृती अचानक गंभीर होऊन त्यांना रुग्णालय गाठावे लागते. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी जाऊन ऑक्सिजन पातळी तपासणी मोहीम राबविली जात आहे. स्वयंसेवक बाजारातील प्रत्येक ठिकाणी जाऊन तपासणी करीत आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमदार राठोड संकटकाळात नागरिकांच्या मदतीला धावून जात आहे.
सध्या संजय राठोड मित्रमंडळाच्या वतीने ऑक्सिजन पातळी मोहिमेसह कोविड सेंटर येथे दूध, अंडी वाटप सुरू आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हा उपक्रम सुरू आहे. त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून दिग्रसमध्ये नवीन कोविड दक्षता केंद्राची मंजुरी आणली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.