पांढरकवडा पोलिसांची युवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:33 PM2018-09-27T22:33:35+5:302018-09-27T22:34:08+5:30
लगतच्या उमरी येथील युवकाला पांढरकवडा पोलिसांनी ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केली. या प्रकरणी गावकऱ्यांनी गुरूवारी पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकाºयांच्या कार्यालयावर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेलंगटाकळी : लगतच्या उमरी येथील युवकाला पांढरकवडा पोलिसांनी ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केली. या प्रकरणी गावकऱ्यांनी गुरूवारी पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक दिली.
ग्रामसभेतील ठरावानुसार उमरी गावात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली होती. मात्र तरीसुद्धा काहीजण अवैध दारूविक्री करत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी गावकºयांनी दारू अड्ड्यावर धाड टाकून ती पकडली. गावकऱ्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल होताच, तेथे नागरिकांची गर्दी झाली. यावेळी पोलिसांचे वाहन जाण्यासाठी जागा नसल्यामुळे अजय रमेश राय (२४) या तरुणाने ‘या रस्त्याने वाहन वळविता येणार नाही, त्यामुळे वाहन मागे घ्यावे’ असे सांगताच या युवकास पोलीस वाहनाच्या चालकाने शिवीगाळ केली. पोलीस ठाण्यात गावकऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच, गावकरी व सदर युवक पोलीस ठाण्यात गेला असता, त्याला आत बोलावून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालक रिजवान, शिपाई धीरज चव्हाण, महाजन यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एसडीओंना निवेदन देऊन पोलिसांवर कारवाईची मागणी केली.