वेदना अन् माणसाचं नातं घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:19 PM2018-03-15T23:19:45+5:302018-03-15T23:19:45+5:30

आयुष्यात वेदनाच आल्या नसत्या, तर सिंधुताई सपकाळ घडल्या नसत्या. वेदना अन् माणसाचं नातं घट्ट आहे, असे सांगत सिंधुताई सपकाळ यांनी आपला जीवनक्रम उलगडला अन् नेरमध्ये अविस्मरणीय आठवणी ठेऊन गेल्या.

Pain and man's relationship tight | वेदना अन् माणसाचं नातं घट्ट

वेदना अन् माणसाचं नातं घट्ट

Next
ठळक मुद्देसिंधूताई सपकाळ : नेर येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती

ऑनलाईन लोकमत
नेर : आयुष्यात वेदनाच आल्या नसत्या, तर सिंधुताई सपकाळ घडल्या नसत्या. वेदना अन् माणसाचं नातं घट्ट आहे, असे सांगत सिंधुताई सपकाळ यांनी आपला जीवनक्रम उलगडला अन् नेरमध्ये अविस्मरणीय आठवणी ठेऊन गेल्या.
येथे विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती होती. यावेळी आपल्या जीवनातील विविध प्रसंग त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना मांडले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, नगराध्यक्ष वनिता मिसळे, आयोजक व नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, यांची यावेळी उपस्थिती होती.
शिक्षण ते अनाथांची माय, असा जीवनक्रम त्यांनी संवाद साधताना मांडला. म्हशी पाण्यात बसवायच्या अन् शाळेत जायचे. अशाच पध्दतीने चौथीपर्यंत शिक्षण झाले. शाळेला उशीर झाला की मास्तर मारायचे. शेतात म्हैस गेली म्हणून शेतमालकाच्या हातचा मार खायचा. वैवाहिक जीवनातही सुख मिळालं नाही. पतीने मारहाण करून घरातून हाकलून दिलं. रेल्वे स्टेशनवर भीक मागितली. ईभ्रत वाचविण्यासाठी स्मशानाचा आधार घेतला. पोटासाठी चितेवर भाकरी भाजली. जीवनात आलेल्या अशा विविध अनुभवातून सिंधुताई अनाथाची माई बनली.
मुलगा-मुलगी हा भेदभाव बाळगू नका. मुलींनी अंगभर कपडे घालावे. मुलगी माई वाटली पाहिजे असेही आवाहन सिंधुतार्इंनी केले. त्या म्हणाल्या. २९२ जावई, ४९ सुना व १७५ गाई. ७५० पुरस्कार, तीन राष्ट्रपतींनी केलेला सन्मान घेतलेली माई आज ममता बाल सदन (कुंभारवळन, ता. पुरंदर, जि पुणे) चालविते.
आपल्या मृत्यूनंतर अनाथ मुलांचा हा डोलारा माझी लेकरं चालवतील. त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलल्याचे त्या म्हणाल्या. जीवनात जो माफ करणे शिकला, तोच पुढे जाईल. हार मानू नका. २० वर्षांची असताना मी स्वत:ला वाचवू शकली मग आपण का नाही. सन्मान करणे शिका, जीवन मंगलमय होईल, असा संदेश सिंधुताई सपकाळ यांनी दिला.

Web Title: Pain and man's relationship tight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.