पांढरकवडा पंचायत समितीचे सभापती पंकज तोडसाम पायउतार; ६ विरुद्ध १ मतांनी झाला अविश्वास ठराव पारित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:44 AM2021-07-28T04:44:27+5:302021-07-28T04:44:27+5:30
या सभेला पंचायत समितीचे ८ पैकी ७ सदस्य उपस्थित होते. यामध्ये ज्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. ते ...
या सभेला पंचायत समितीचे ८ पैकी ७ सदस्य उपस्थित होते. यामध्ये ज्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. ते पंकज तोडसाम, इंदू मिसेवार, संतोष बोडेवार, अनुराधा वेट्टी, राजेश पासलावर हे शिवसेनेचे, तर भाजपच्या शीला गेडाम व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरेंद्र नंदुरकर यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या एकमेव सदस्य उज्ज्वला बोंडे या मात्र या सभेला अनुपस्थित होत्या. उपस्थित ७ सदस्यांपैकी ६ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे अध्यासी अधिकाऱ्यांनी पंकज तोडसाम यांच्यावर ६ विरुद्ध १ मतांनी अविश्वास ठराव पारित झाल्याचे घोषित केले. भाजपचे नेते अण्णासाहेब पारवेकर यांच्या पुढाकाराने तोडसाम यांच्या विरोधात हा अविश्वास ठराव प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. आठ सदस्य संख्या असलेल्या पांढरकवडा पंचायत समितीत पाच सदस्य शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत; परंतु पांढरकवडा पंचायत समितीच्या आठ सदस्यांपैकी सहा सदस्यांनी शिवसेनेच्या तोडसाम यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. यासाठी पारवेकर यांच्या गटाने पुढाकार घेतला होता. आठ सदस्य असलेल्या पांढरकवडा पंचायत समितीत आठपैकी पाच सदस्य हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. तर भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी १ सदस्य निवडून आला होता. ५ सदस्य शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले असले तरी बहुसंख्य सदस्य हे पारवेकर गटाचे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या चार सदस्यांनी एक भाजपचा व एक राष्ट्रवादीचा सदस्य सोबत घेऊन सहा सदस्यांच्या सह्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठराव पारित होण्यासाठी या सहाही सदस्यांची आवश्यकता होती. त्यामुळे या अविश्वास ठरावाकडे तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.