पांढरकवडा पोलिसांनी दिले ४५ जनावरांना जीवदान, दिवसातील चौथी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:52 AM2021-07-07T04:52:02+5:302021-07-07T04:52:02+5:30

जनावरांच्या तस्करीवर निर्बंध आणण्याचे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त होताच, गेल्या काही दिवसांपासून पांढरकवडा पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. रविवारी ...

Pandharkavada police rescued 45 animals, fourth action of the day | पांढरकवडा पोलिसांनी दिले ४५ जनावरांना जीवदान, दिवसातील चौथी कारवाई

पांढरकवडा पोलिसांनी दिले ४५ जनावरांना जीवदान, दिवसातील चौथी कारवाई

Next

जनावरांच्या तस्करीवर निर्बंध आणण्याचे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त होताच, गेल्या काही दिवसांपासून पांढरकवडा पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. रविवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर सहायक पोलीस निरीक्षक भरत चापाईतकर हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना

मध्यप्रदेशातील भोपाळ येथून हैद्रबादकडे एक कंटेनर (क्र. पी.बी. ०८ बी.एन. ५२७७) कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार या मार्गावरील पिंपळखुटी चेकपोस्टवर पोलिसांनी सापळा रचला. पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास एक कंटेनर चेकपोस्टवर पोहचताच, चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने कंटनेर अडवून त्याची झडती घेतली असता, त्यात ४८ बैल दाटीवाटीने बांधून बसविण्यात आल्याचे दिसून आले. त्यातील तीन बैल मृत्युमुखी पडले होते. अन्य जनावरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गोरक्षणमध्ये ठेवण्यात आले.

या प्रकरणी भुरेखान बाबू खान (५३) रा. सिहोरा मध्यप्रदेश, शाहरूख भुरेखान (२३) रा.सिहोरा, मध्यप्रदेश,

शब्बीर शेख सलीम शेख (३३) रा. दमुआ, मध्यप्रदेश, असीफ शमीम खॉ (२८), रा. सिहोरा, मध्यप्रदेश या चौघांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भरत चापाईतकर, सहायक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी, पो.हवा. शर्मा, पो.हवा. चव्हाण, नायक पोलीस पठाण, पोलीस शिपाई बेलयवार यांनी केली.

Web Title: Pandharkavada police rescued 45 animals, fourth action of the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.