पैनगंगा खाण तस्करी कनेक्शन वणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 09:55 PM2019-01-24T21:55:24+5:302019-01-24T21:56:31+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगत असलेली पैनगंगा कोळसा खाण सध्या कोळसा तस्करांच्या रडारवर आहे. मागील आठवड्यात काही तस्करांनी या खाणीत सशस्त्र धुडगूस घातला. या प्रकरणाची गडचांदूर पोलीस चौकशी करीत असून याचा मुख्य सूत्रधार वणीत असल्याचे पुढे आहे.

Panganga mine trafficking connection | पैनगंगा खाण तस्करी कनेक्शन वणीत

पैनगंगा खाण तस्करी कनेक्शन वणीत

Next
ठळक मुद्देलालपुलियावर चालतो व्यवहार : चालकासह चार ट्रक पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगत असलेली पैनगंगा कोळसा खाण सध्या कोळसा तस्करांच्या रडारवर आहे. मागील आठवड्यात काही तस्करांनी या खाणीत सशस्त्र धुडगूस घातला. या प्रकरणाची गडचांदूर पोलीस चौकशी करीत असून याचा मुख्य सूत्रधार वणीत असल्याचे पुढे आहे. दरम्यान, गुरूवारी चंद्रपूर पोलीस दलाच्या पथकाने वणी येथे येऊन चार ट्रक ताब्यात घेतले. तसेच एका चालकालाही अटक करण्यात आली.
येथील लालपुलिया परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चोरीचा कोळसा उतरविला जातो. या व्यवहारात दररोज लाखोची उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते. अलिकडेच चंद्रपूर जिल्ह्यातील काही तस्करांनी पैनगंगा कोळसा खाणीत जाऊन सशस्त्र धुमाकूळ घातला. यावेळी कोळसा भरण्यासाठी आलेली वाहने ही यवतमाळ जिल्ह्यातील पासिंग होती. या पार्श्वभूमीवर वेकोलिकडून तक्रार झाल्यानंतर गडचांदूर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. हे आरोपी घुग्गूस येथील असल्याचे सांगण्यात येते. मात्र या टोळीचा मुख्य सूत्रधार हा वणीतील असल्याची चर्चा आहे.
हा सूत्रधार चोरीचा कोळसा मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असल्याची चर्चा असून गडचांदूर पोलीस सध्या त्याच्या मागावर आहे. गुरूवारी चंद्रपूर पोलिसांचे पथक वणीत येऊन गेले. मात्र टोळीचा हा म्होरक्या त्यांच्या हाती लागला नाही.
काही महिन्यांपूर्वी वेकोलिने कोळसा चोरीवर आळा घालण्यासाठी विशेष सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली. त्यामुळे कोळसा चोरीला काही प्रमाणात आळा बसला असला तरी गुन्हेगारी प्रवृत्तीचे तस्कर शस्त्राच्या धाकावर खाणीत जाऊन कोळसा लंपास करत असल्याच्या घटना अलिकडील सहा महिन्यात मोठ्या प्रमाणावर घडल्या. वणी परिसरातील बहुतांश कोळसा खाणी बंद पडल्याने या परिसरात कोळसा चोरीला वाव नसल्याने तस्करांनी आपला मोर्चा चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगत असलेल्या पैनगंगा कोळसा खाणीकडे वळविला. या खाणीतील सुरक्षा यंत्रणा कमकुवत असल्याने त्याचा फायदा या तस्करांना होत आहे.
कोळसा चोरल्यानंतर तो थेट वणी येथील लालपुलियावर आणून उतरविला जातो. लालपुलियावर हा चोरीचा कोळसा खरेदी करणारा एकमेव खरेदीदार आहे. नागपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमधूनदेखिल मोठ्या प्रमाणावर कोळशाची चोरी करून तो कोळसा वणी शहरात आणून विकल्या जात आहे.

राडा झाल्यावरच केली जाते वेकोलिकडून तक्रार
कोळसा खाणीत राडा झाल्यावरच वेकोलि प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रारी करण्यात येतात. अन्यवेळी मात्र तक्रारी करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याने वेकोलि प्रशासनाच्या भूमिकेवरदेखिल शंका घेतल्या जात आहे.

Web Title: Panganga mine trafficking connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.