खासगी फायनान्सची महिलांमध्ये दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 09:39 PM2019-07-06T21:39:07+5:302019-07-06T21:39:59+5:30

शासनाकडून तात्काळ कर्ज मिळत नसल्याने नाईलाजाने अनेक बचत गटांच्या महिलांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. यातून स्वयंरोजगार सुरु केला. परंतु एखादा हप्ता चुकला की कंपनीचे अधिकारी महिलांना वसुलीसाठी धमकावतात. ही दादागिरी बंद व्हावी, यासाठी बचत गटांच्या महिलांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.

Panic among private finance women | खासगी फायनान्सची महिलांमध्ये दहशत

खासगी फायनान्सची महिलांमध्ये दहशत

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । स्वयंरोजगाराला धोका, पोलिसांनी बंदोबस्त करावा, जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्जव

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : शासनाकडून तात्काळ कर्ज मिळत नसल्याने नाईलाजाने अनेक बचत गटांच्या महिलांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. यातून स्वयंरोजगार सुरु केला. परंतु एखादा हप्ता चुकला की कंपनीचे अधिकारी महिलांना वसुलीसाठी धमकावतात. ही दादागिरी बंद व्हावी, यासाठी बचत गटांच्या महिलांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला निवेदन सादर केले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजना आहे. परंतु माहितीअभावी या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे स्वत:चा स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन रोजगार सुुरु करण्यात आला आहे. कर्जाचे व्याज हप्तेवारीने भरले जात आहे. परंतु काही बचत गटांना आलेल्या अडचणीमुळे व्याजाचा हप्ता भरणे झाले नाही, तर कंपनीचे कर्मचारी घरी येऊन शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले आहे. वसुलीसाठी घर नाही तर शेती नावावर लिहून मागितली जाते. यामुळे महिला सदस्य वैतागून गेल्या आहेत. अडचणीत असल्याने बचत गटाच्या महिलांनी कर्जाची उचल केली. परतफेडही सुरू आहे तरीही त्रास दिला जात आहे.

आमच्या अडचणी समजून घ्या
घेतलेले कर्ज आम्ही भरण्यास तयार आहो. परंतु अडचणीत असणाऱ्या बचत गटांना धमकावणे थांबवा. अन्यथा महिलांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्रास देणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीची चौकशी करुन कायदेशीर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.

बचत गटाच्या संरक्षणासाठी यांचा पुढाकार
कळंब भाजप महिला आघाडी सरचिटणीस वैष्णवी चिमुरकर, कल्पना आत्राम, सपना लिल्हारे, ज्योती देवतळे, मंजुळा मांदाडे, दुर्गा चापडोह, पुष्पा देवतळे, वनिता देवतळे, वच्छला मानकर, यशोदा वरणे, तुळसा घोटेकर, मंदा टेकाम, पंचफुला वरणे, बेबी शेंडे, मीना रामपुरे, लंका कासार, सरस्वती देवतळे, चंद्रकला कासार, निर्मला पंधरे, मीना मानकर, अरुणा देवतळे, वर्षा पाळेकर, सुगंधा वरणे, उषा भोसेकर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Panic among private finance women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.