पारधी समाज, शेतकरी विधवांचे संमेलन
By admin | Published: September 15, 2016 01:22 AM2016-09-15T01:22:34+5:302016-09-15T01:22:34+5:30
पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त समारोह समितीतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे,
दौड स्पर्धा : दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त समारोह
यवतमाळ : पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त समारोह समितीतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
२५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीदिनी एकात्मता दौड स्पर्धा येथील पोस्टल मैदानापासून सुरू होईल. १६ वर्षावरील व १६ वर्षाआतील, अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. दोन्ही गटात महिला व पुरुषांचे वेगळे गट राहतील. चारही गटातील विजेत्यांना दोन हजार, एक हजार ५००, एक हजार आणि ५०० रुपयांचे अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे पुरस्कार दिले जातील.
तत्पूर्वी पारधी समाजातील प्रतिष्ठीतांचे संमेलन, स्वयंसेवी संस्थांचे संमेलन, पीएचडीधारकांचा परिसंवाद, विधवा शेतकरी महिलांचे संमेलन, व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थी संगोष्टी आदी कार्यक्रम होणार आहे.
जन्मशताब्दीचा मुख्य कार्यक्रम ८ आॅक्टोबरला पोस्टल मैदानावर होणार आहे. यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मुख्य मार्र्गदर्शन होणार आहे. त्याच दिवशी दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाच्या कृषी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी पदाधिकारी आणि सदस्य झटत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या समारोहाच्या तयारीसाठी त्यांची धडपड सुरू आहे. यासाठी त्यांना समितीचे पदाधिकारी आदींचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत आहे. (शहर प्रतिनिधी)