वऱ्हांड्यातच भरली परमडोहची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:12 PM2019-06-26T22:12:46+5:302019-06-26T22:13:09+5:30

३ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे परमडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत उडाले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने आजतागायत शाळेची डागडुजी केली नाही. परिणामी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनाना स्वागताऐवजी हिरमुसले चेहरे घेऊन वऱ्हांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागले.

Paramdah's school is full of the upper | वऱ्हांड्यातच भरली परमडोहची शाळा

वऱ्हांड्यातच भरली परमडोहची शाळा

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मनस्ताप : वादळाने उडून गेले शाळेचे छप्पर

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदोला : ३ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे परमडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत उडाले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने आजतागायत शाळेची डागडुजी केली नाही. परिणामी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनाना स्वागताऐवजी हिरमुसले चेहरे घेऊन वऱ्हांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागले.
वणी तालुक्यातील परमडोह, चिखली, टाकळी गावांना ३ जून रोजी वादळी पावसाचा फटका बसला होता. यात परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे छत पूर्णपणे उडाले होते. यावेळी पावसामुळे शाळेतील डिजिटल शैक्षणिक साहित्यांचे नुकसान झाले होते. २६ जूनपासून शाळा सुरू होणार त्याअनुषंगाने प्रभारी सरपंच संदीप थेरे यांनी निवेदनाद्वारे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळेच्या छताची त्वरित डागडुजी करण्याची मागणी केली. परंतु शिक्षण विभागाने मागणीकडे दुर्लक्ष केले.
बुधवारी शाळा सुरू झाली. अनेक शाळांत विद्यार्थ्यांच्या स्वागताची जंगी तयारी होत असताना मात्र परमडोह येथील चिमुरड्यांच्या चेहऱ्यांवरील उत्साह व्यवस्थेने हिरावून घेतला. विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था कुठे करावी, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर उभा ठाकला होता. सरपंच संदीप थेरे यांनी या कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. परंतु बुधवारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी परमडोहच्या शाळेला भेट देऊन पाहणी केली.
शासनाने एकीकडे शिक्षण हक्क कायद्याचा विस्तार करीत ३ ते १८ वर्षे वयोगटातील सर्वांना मोफत, सक्तीचे शिक्षण देण्याची शिफारस करण्यात आली. मात्र अनेक गावांत शाळांच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. शाळांत विद्यार्थ्यांना वर्गखोल्या, खेळण्यासाठी मैदान, शौचालय, ग्रंथालय आदी सुविधा उपलब्ध नाही. बहुतांश ठिकाणी अशी परिस्थिती असल्याचे चित्र आहे. मग प्राथमिक शिक्षणासह उच्च माध्यमिक शिक्षण आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांना कसे काय मोफत मिळू शकेलं, असा प्रश्न निर्माण होतो.
आज पंचायत समितीत भरविणार शाळा
३ जून रोजी आलेल्या वादळात परमडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या तीन वर्गखोल्यामधील १५० ते २०० टिनपत्रे उडून गेले. त्यामुळे या शाळेवर आता छप्परच नाही. शाळा सुरू व्हायला २३ दिवसांचा अवधी असताना प्रशासनाने या काळात शाळा दुरूस्ती करायला हवी होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने गावकºयांत संताप आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी गुरूवारी वणीच्या पंचायत समितीत शाळा भरविणार असल्याचे पं.स.सदस्य संजय निखाडे यांनी सांगितले.

शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही शाळा दुरूस्तीसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. शाळा दुरूस्तीसाठी आता गावकरी आंदोलनाच्या तयारीत आहे.
- संदीप थेरे, प्र.सरपंच

परमडोहच्या शाळेवरील छप्पर उडून गेल्यानंतर तातडीने पं.स.अभियंत्याला तेथे पाठवून तीन लाखांचे इस्टीमेट तयार करून ते वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे. निधी मंजूर झाला आहे. लवकरच शाळा दुरूस्तीला सुरूवात होणार आहे.
- प्रकाश नगराळे, प्र.गटशिक्षणाधिकारी

Web Title: Paramdah's school is full of the upper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.