पालकांनी केला शिक्षिकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:50 AM2021-09-08T04:50:31+5:302021-09-08T04:50:31+5:30
मागील तीन वर्षांपासून किन्हाळा शाळेत कार्यरत मुख्याध्यापिका स्मिता देशभ्रतार आणि शिक्षिका चित्रा डहाके यांनी नावीन्यपूर्ण विविध उपक्रम, सहशालेय कार्यक्रम, ...
मागील तीन वर्षांपासून किन्हाळा शाळेत कार्यरत मुख्याध्यापिका स्मिता देशभ्रतार आणि शिक्षिका चित्रा डहाके यांनी नावीन्यपूर्ण विविध उपक्रम, सहशालेय कार्यक्रम, पालकांचा सहभाग या सर्वांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. एवढेच नव्हे तर लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असतानाही ऑनलाईन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवून शैक्षणिक कार्य चालू आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत किन्हाळा येथील पालकांकडून त्या दोघींचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष विष्णुदास आडे, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शुभम भोयर, नानाजी आसेकर, अरूण डांगाले, बंडू क्षीरसागर उपस्थित होते. प्रास्ताविक निलिमा देठे यांनी केले. संचलन अमृता काकडे यांनी केले, तर आभार स्वाती शास्त्रकार यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रियंका सिडाम, विद्या क्षीरसागर, पार्वती आडे, कोमल सोमटकर, विद्या काथवटे, सुकेशनी कडुकर, मनोज कडुकर, गुणवंत येरमे, अनंता काथवटे, प्रवीण काकडे यांनी परिश्रम घेतले.