परसोडी गावात कोंबडीशिवाय पिलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 09:48 PM2018-11-26T21:48:29+5:302018-11-26T21:48:50+5:30

कोंबडी अंड्यावर बसविल्याशिवाय पिलं तयारच होत नाही, असच कुणी सांगेल. कोंबडीशिवाय पिलं तयार झाली म्हटले तर हसतील. मात्र आजच्या कल्पकतेच्या युगात हे सर्व घडत आहे. किचकट, दीर्घ कालावधीच्या आणि अडकून पडण्याच्या पध्दती बाद होत चालल्या आहे.

Parsodi village without poultry | परसोडी गावात कोंबडीशिवाय पिलं

परसोडी गावात कोंबडीशिवाय पिलं

Next
ठळक मुद्देकल्पकतेची किमया : पृष्ठाचा डबा व लाईटचा वापर, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी

गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : कोंबडी अंड्यावर बसविल्याशिवाय पिलं तयारच होत नाही, असच कुणी सांगेल. कोंबडीशिवाय पिलं तयार झाली म्हटले तर हसतील. मात्र आजच्या कल्पकतेच्या युगात हे सर्व घडत आहे. किचकट, दीर्घ कालावधीच्या आणि अडकून पडण्याच्या पध्दती बाद होत चालल्या आहे. परसोडी (ता.कळंब) गावातील युवकांनी हीच कास धरत कोंबडीशिवाय पिलं तयार करण्याची किमया साधली आहे.
परसोडी (बु.) येथील ऋषीकेश दीपक ढोले व त्याचे काका प्रशांत अंकुश ढोले यांनी कोंबडी अंड्यावर न बसविता पिल्ले तयार करणारे यंत्र विकसित केले. यासाठी त्यांना केवळ ७०० रुपये खर्च आला आहे. परसोडी (बु.) येथील सरपंच आणि प्रगतशील शेतकरी आनंदराव जगताप यांनी गावराण कोंबड्या पाळल्या आहे. त्यांच्याकडील दोन कोंबड्या अंड्यावर बसत नव्हत्या. याची माहिती कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला ऋषीकेश दीपक ढोेले आणि प्रशांत अंकुश ढोले यांना देण्यात आली. ऋषीकेशने यापूर्वी शेतीत अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहे. कोंबडीशिवाय पिलाचा प्रयोग यशस्वी करण्याचा चंग त्याने बांधला. यात तो यशस्वीसुध्दा झाला. यासाठी अनेक पुस्तके चाळली.
अंडी उबविण्यासाठी ३७ ते ३८ डिग्री तापमान व ७० ते ८० टक्के आर्द्रतेची गरज असते, अशी माहिती त्यांना मिळाली. सर्वप्रथम त्यांनी ४० अंडी मावतील इतका पृष्ठाचा डबा आतून थर्माकोल लाऊन तयार केला. डब्यात ३८ अंडी ठेवली. ६० पॉवरचा लाईट लावला. ३८ डिग्री तापमान होताच लाईट आपोआप बंद होईल, अशी यंत्रणा (सेंसर) विकसित केली. आर्द्रतेसाठी बल्बखाली पाणी ठेवले. बल्बच्या तापमानाने पाण्याची वाफ होऊन डब्यात आर्द्रता मिळविण्यात आली. कालांतराने अंडी फिरविण्यात आली. डब्यात ठेवलेल्या ३८ अंड्यापैकी २१ दिवसानंतर ३५ अंड्यातून पिल्ले बाहेर आली. कोंबडी अंडी उबविते तेव्हा पूर्ण अंड्यातून पिल्ले बाहेर येत नाही. कृत्रिम प्रयोगाचा सक्सेस रेट यापेक्षा अधिक आहे.
घरीच करता येणारा प्रयोग
कोणालाही घरच्याघरी करता येण्यासारखा हा प्रयोग आहे. याचे अनेक फायदे आहेत. कोंबडीला २१ दिवस अंड्यावर बसण्याची आणि पिलांना सांभाळण्याची गरज नाही. कोंबडी पुन्हा लवकरच अंडी द्यायला तयार होते. या प्रयोगाच्या यशांनतर ऋषीकेशने एकाच वेळी ३०० अंडी बसतील, असे यंत्र विकसित केले आहे. यापूर्वी त्याने फवारणी यंत्र व खत पेरणी यंत्र तयार केलेले आहे.

Web Title: Parsodi village without poultry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.