यवतमाळ जिल्ह्यात सोमवारपासून अंशत: व्यवहार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 01:04 PM2020-04-18T13:04:34+5:302020-04-18T13:05:01+5:30
कोरोना संसर्गाच्या भितीने लॉकडाऊन वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ३ मेपर्यंत संचारबंदीचा कालावधीही वाढविला आहे. परंतु सशर्त परवानगीमुळे सोमवारपासून काही क्षेत्रातील व्यवहार अशंत: सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना संसर्गाच्या भितीने लॉकडाऊन वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ३ मेपर्यंत संचारबंदीचा कालावधीही वाढविला आहे. परंतु सशर्त परवानगीमुळे सोमवारपासून काही क्षेत्रातील व्यवहार अशंत: सुरू होणार आहे. १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी या संबंधी आदेश काढले.
कोरोना बाधित १५ रुग्णांची आतापर्यंत नोंद झाल्याने यवतमाळ जिल्ह्याचा ह्यरेड झोनह्णमध्ये समावेश करण्यात आला आहे. पुढे रुग्ण संख्या न वाढल्यास १३ मेनंतर जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश होऊ शकतो. संशयावरून दररोज नागरिकांना वैद्यकीय निगराणीत ठेवले जात आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहे. दरदिवशी अहवाल येत असून ते बहुतांश निगेटीव्ह राहत आहे. परंतु केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार सोमवार २० एप्रिलपासून काही बाबींसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बºयाच क्षेत्रातील कामकाज सुरू होण्यास मदत मिळणार आहे.
अधिकारी पूर्ण, कर्मचारी ३३ टक्के
सोमवारपासून केंद्र शासनाची आरोग्य व कुटुंब कल्याण, आपती व्यवस्थापन, जिल्हा सूचना व विज्ञान केंद्र, एनसीसी, नेहरु युवा केंद्र हे कार्यालय सुरू राहतील. राज्य शासनाची पोलीस, होमगार्ड, अग्नीशमन दल, आपतकालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृह, नगरपरिषद, नगरपंचायती कोणत्याही निबंर्धाशिवाय सुरू राहतील. राज्य शासनाच्या इतर खात्याचे वर्ग अ आणि ब चे अधिकारी आवश्यकतेनुसार कार्यालयात उपस्थित राहतील. गट क संवगार्तील कर्मचाºयांच्या ३३ टक्के उपस्थितीने कार्यालय सुरू राहतील. त्यांना सामाजिक अंतर पाळणे व सामान्य जनतेला पूर्ण सेवा देण्याचे बंधन आहे. जिल्हा प्रशासन व कोषागार ही कार्यालये निर्बंधित कर्मचारी संख्येने सुरू राहतील. सार्वजनिक सेवांच्या उपलब्धतेसाठी आवश्यक कर्मचारी वर्ग नेमण्याचे आदेश आहे. वन कार्यालयातील कर्मचारी, प्राणी संग्रालय, रोपवाटिका, वन्यजीव, जंगलातील वणवा-आगी नियंत्रण करणारी यंत्रणा, वृक्षारोपण, गस्त घालणे ही कामेही सुरू राहतील. विलगीकरण कक्षातील यंत्रणेसाठीही दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात सर्व औद्योगिक व वाणिज्यीक प्रतिष्ठाने व कामाच्या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी एसओपी जिल्हा कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची इन्सीडन्ट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात येईल. त्यांच्या सूचनेनुसार तेथे सर्व खात्याचे काम चालेल. अत्यावश्यक सेवेकरिता तेच पासेस निर्गमित करतील. सर्व आरोग्य सेवा सुरू राहतील.
एपीएमसी, किराणा, दुध, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, गॅरेज, मोबाईल दुरुस्तीला परवानगी
नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्राबाहेरील व ग्रामीण क्षेत्रातील रस्ते, सिंचन प्रकल्प, इमारती व सर्व प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पाचे बांधकाम, नवीनीकरण ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम.
नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील सुरू असलेली बांधकामे स्थानिक मजूर उपलब्ध असेल तर पुढे सुरू राहतील. या कामांसाठी बाहेरुन मजूर आणता येणार नाही.
वैद्यकीय, पशु वैद्यकीय सेवांसाठी व्यक्तींच्या हालचाली ग्राह्य राहील. वस्तू खरेदीसाठी खासगी वाहनांना परवानगी. चारचाकी वाहनात चालकाव्यतिरिक्त केवळ एक तर दुचाकी वाहनावर केवळ चालकाला परवानगी असेल.
जिल्हा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार कामाच्या ठिकाणी जाणारे व कामावरून येणारे सर्व कर्मचारी.
शेती व फळबागा संबंधी कामे पूर्णपणे कार्यरत राहतील. शेतकरी व शेतमजुरांना शेतविषयक कामे करण्यास मुभा.
कृषी उत्पादने, खरेदी यंत्रणा, शेतमालाचे विपणन, हमी भावाने खरेदी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंडी सुरू राहील. शेतीविषयक यंत्रे व सुटे भाग विक्री व दुरुस्ती दुकाने, त्यांच्या पुरवठा साखळीसह सुरू राहतील.
शेतीकरिता भाडे तत्वावरील अवजारे पुरवठा करणारे सेंटर, रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे याचे उत्पादन, वितरण व किरकोळ विक्री सुरू राहील. शेतमालाची काढणी व पेरणी करणाऱ्या हार्वेस्टर व अन्य कृषी अवजारांची आंतरजिल्हा व आंतरराज्य वाहतूक सुरू राहील.
मासेमारीचे सर्व व्यवसाय, वाहतूक, पशु विभागाशी संबंधित दुध संकलन प्रक्रिया, वितरण-विक्री, पशु पालन, कुकुटपालन, जनावरांच्या छावण्या, गो-शाळा, बँका, एटीएम, आयटी सेवा, बँकिंग आदी सेवा सुरू राहतील.
इलेक्ट्रीशियन, संगणक, मोबाईल दुरुस्ती, वाहन दुरुस्ती केंद्र, नळ कारागीर, सूतार, ग्रामीण भागातील विटभट्टी यांची कामे सुरू राहतील.
जीवनावश्यक वस्तू विकणारे प्रतिष्ठान, धान्य व किराणा, फळे व भाज्या, दूध, अंडी, मांस, मच्छी, पशु खाद्य, त्यांचा चारा विक्रीची दुकाने सुरू राहतील. घरपोच सेवा देण्याला अधिक प्राधान्य असेल.
महामार्गावरील ट्रक दुरुस्ती व ढाब्यांची दुकाने, कुरिअर सेवेसह काही आस्थापनांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
१५ एप्रिलच्या आदेशात सामाजिक क्षेत्र, मनरेगाची कामे, सार्वजनिक सुविधा, वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याशिवाय इतर विविध क्षेत्रातील अनेक कामांना मंजुरी दिली गेली.
या सेवा बंदच राहतील, अंत्यविधीत केवळ २०
संचारबंदी काळात ३ मेपर्यंत सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वे प्रवासी वाहतूक, सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या बसेस आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवास-वाहतूक, सर्व शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग, औद्योगिक व वाणिज्यीक आस्थापना, आतिथ्य सेवा, सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायाम शाळा व क्रीडा कॉम्पलेक्स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, सभागृह, असेम्बली हॉल व इतर तत्सम ठिकाणे, टॅक्सी आणि कॅब (आॅटो व सायकलरिक्षासह), सामाजिक, राजकीय कार्ये, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इतर मेळावे, सर्वधार्मिक स्थळे, पुजेची ठिकाणी बंद राहतील. अंत्यविधी प्रसंगी २० पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नसेल.