पर्वराज अष्टानिका महापर्वाला प्रारंभ
By admin | Published: July 16, 2016 02:44 AM2016-07-16T02:44:20+5:302016-07-16T02:44:20+5:30
भारतीय जैन समाजातील सर्वात मोठा आणि महत्वाचा असणारा पर्वराज अष्टानिका महापर्वाला उमरखेड येथे मंगळवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.
उमरखेड : भारतीय जैन समाजातील सर्वात मोठा आणि महत्वाचा असणारा पर्वराज अष्टानिका महापर्वाला उमरखेड येथे मंगळवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. येथील जुनी गुजरी परिसरातील दिगंबर जैन मंदिरात जैन महिला मंडळाने या उत्साहाला प्रारंभ केला.
भगवान महावीरांच्या सुरू असलेल्या या पर्वात सिद्धचक्र विधान महापूजेचे अनन्य साधारण महत्व असते. त्यामुळेच या पूजेचे आयोजन महिला मंडळाने मोठ्या धार्मिक भावनेने केले आहे. सात दिवस सुरू असलेल्या या महापर्वाची सुरुवात ध्वजारोहण व घटस्थापनेने करण्यात आली. दैनंदिन महापूजा, जप, अभिषेक, शास्त्र प्रवचन, धर्मचर्चा केली जात आहे. या दरम्यान जैन नववर्ष प्रारंभ होणार असल्याने विरशासन जयंती प्रथम जैन पर्वानिमित्त विशेष प्रवचन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे प.पू. संतशिरोमनी महाकवी आचार्य विद्यासागर यांचे परम प्रभावक आज्ञानुवर्ती शिष्यद्वय अभिक्ष्वज्ञानोपयोगी मुनिश्री अक्षयसागरजी महाराज आणि अभांक्ष्ण मुनिश्री नेमीसागरजी महाराज यांचा मंगल आशीर्वाद या उत्साहाला प्राप्त झाला आहे. सदर महापूजेसे औरंगाबाद निवासी पंडिता डॉ.उज्वला जैन यांचे मंगल सानिध्य लाभले आहे. या महापर्वासाठी शालिनी कळमकर, सुनीता महाजन, तेजश्री जैन, उज्वला जैन, मीना महाजन, सुधा अन्नदाते, भारती महाजन, सरोज अन्नदाते, छाया कस्तुरे, मंजुषा सोनटक्के, अनिता कस्तुरे, प्रीती सोनटक्के, विजया अहेर, वंदना भागवते यांच्यासह अनिल अन्नदाते, नंदकुमार सोनटक्के, बाबूराव महाजन, राजू सोनटक्के, प्रवीण जैन, अॅड. संतोष जैन यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे. (शहर प्रतिनिधी)