खबरदारीअभावी जाताहेत प्रवाशांचे जीव

By admin | Published: December 28, 2015 03:40 AM2015-12-28T03:40:33+5:302015-12-28T03:40:33+5:30

रेल्वेगाड्यात कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे तोल जाऊन खाली पडल्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू होत आहे.

Passengers of passenger going away due to caution | खबरदारीअभावी जाताहेत प्रवाशांचे जीव

खबरदारीअभावी जाताहेत प्रवाशांचे जीव

Next

प्रमाण वाढले : कोचच्या दारावर उभे राहून करतात प्रवास
नागपूर : रेल्वेगाड्यात कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे तोल जाऊन खाली पडल्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू होत आहे. तर असंख्य प्रवासी गंभीर जखमी होऊन त्यांना कायमचे अपंगत्व येण्याच्या घटनात वाढ झाली आहे.
रेल्वेगाडीत प्रवास करताना अनेक प्रवासी मोबाईलवर बोलत बोलत कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करतात. मोबाईलवर बोलण्याच्या नादात त्यांचे लक्ष नसल्यामुळे अचानक पाय घसरून त्यांचा तोल जातो. आधीच गाडी वेगात असल्यामुळे ते जोरात खाली फेकल्या जातात. यात ते गंभीर जखमी होतात. अनेक प्रवाशांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तर काहींचा अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेस्थानकावर प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी फूट ओव्हरब्रीजची सुविधा आहे. परंतु शॉर्टकटच्या नादात अनेक प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न अनेकदा त्यांच्या जीवावर बेततो. वेगात असलेल्या रेल्वेगाडीला एकदम ब्रेक मारणे शक्य होत नसल्याने संबंधित रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशाच्या चिंधड्या उडतात. या घटनात सातत्याने वाढ होत आहे. वारंवार अशा घटना घडूनही प्रवासी त्यापासून कुठलाच धडा घेताना दिसत नाहीत. त्यामुळे खबरदारी बाळगून आपला जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

अशी आहे दंडाची तरतूद

रेल्वेगाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रवाशांवर रेल्वे अ‍ॅक्ट १५६ नुसार कारवाईची तरतूद आहे. या अ‍ॅक्टनुसार एक हजार रुपये दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. फूटओव्हरब्रीज टाळून रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवरही रेल्वे अ‍ॅक्ट १४७ नुसार कारवाई करण्यात येते. या अ‍ॅक्टनुसार ५०० रुपये दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.

सूचना, पथनाट्याद्वारे जनजागृती
‘प्रवाशांनी रेल्वेगाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे तसेच रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारचे कृत्य प्रवाशांनी करू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येतात. यात ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना सूचना देणे, रेल्वेस्थानकावर पथनाट्य सादर करून प्रवाशांमध्ये जनजागृती करणे आणि रेल्वेगाड्यात स्टिकर्स लावून माहिती पुरविण्याचे काम करण्यात येते.’
कल्याण मोरे, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल

Web Title: Passengers of passenger going away due to caution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.