प्रवासी बसस्थानकांवर परतले मात्र, एसटीच्या फेऱ्याच कमी, चालक-वाहकांना बसतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 05:00 AM2020-12-20T05:00:00+5:302020-12-20T05:00:07+5:30

अशातच महामंडळाकडून पगार कपात केली जाते. त्यामुळे त्यांचे मासिक आर्थिक बजेट बिघडते. जिल्ह्यातील अपवाद वगळता आगारांमध्ये कर्मचाऱ्यांना ड्यूटीची प्रतीक्षा करून अखेर घरी जावे लागते, त्यांची हजेरी भरली जात नाही. अलीकडे प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, काही गावांमधून प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगत  फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. परिणामी उत्पन्नही कमी मिळत आहे. १२ लाख रुपये एवढे सरासरी उत्पन्न कमी झाल्याचे सांगितले जाते.

Passengers return to the bus stops, however, less the turn of the ST, hitting the driver-carrier | प्रवासी बसस्थानकांवर परतले मात्र, एसटीच्या फेऱ्याच कमी, चालक-वाहकांना बसतो फटका

प्रवासी बसस्थानकांवर परतले मात्र, एसटीच्या फेऱ्याच कमी, चालक-वाहकांना बसतो फटका

Next
ठळक मुद्देआगारांचेही दररोज १२ लाख रुपयांचे नुकसान; बिनपगारीमुळे यंत्रणा त्रस्त

  लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वैश्विक महामारी कोरोनाचा मोठा फटका लोकवाहिनीला बसला आहे. अजूनही अनेक गावांसाठी बसफेऱ्या नाहीत. प्रामुख्याने ग्रामीण भागातील फेऱ्यांबाबत हा अनुभव आहे. याचा परिणाम वाहक आणि चालकांवर काही प्रमाणात होत आहे. ड्यूटी लागत नसल्याने त्यांची गैरहजेरी लागते. या प्रकारात त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच अनेक कामगारांचे वेतन कमी आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना त्यांना मोठी सर्कस करावी लागते. अशातच महामंडळाकडून पगार कपात केली जाते. त्यामुळे त्यांचे मासिक आर्थिक बजेट बिघडते. जिल्ह्यातील अपवाद वगळता आगारांमध्ये कर्मचाऱ्यांना ड्यूटीची प्रतीक्षा करून अखेर घरी जावे लागते, त्यांची हजेरी भरली जात नाही. अलीकडे प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, काही गावांमधून प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगत  फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. परिणामी उत्पन्नही कमी मिळत आहे. १२ लाख रुपये एवढे सरासरी उत्पन्न कमी झाल्याचे सांगितले जाते. कोरोनापूर्वी ४५ लाख रुपये एवढे उत्पन्न मिळत होते. आता ३३ लाख उत्पन्न मिळत असल्याने महामंडळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उत्पन्न वाढण्याच्यादृष्टीने पूर्ण क्षमतेने वाहतूक होणे गरजेचे आहे.

रजा घेण्यासाठी कामगारांवर जोर
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एसटी बसफेऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. अशावेळी काही कामगारांना रजा घेण्यास भाग पाडले जाते. या प्रकारात त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब कामगार संघटना ठासून सांगत असली तरी महामंडळाचे अधिकारी मात्र या बाबीला नकार देत आहे. प्रत्येक कामगाराला दररोज ड्यूटी मिळतेच, असे सांगितले जाते.

जिल्ह्यात बसचे उत्पन्न ४५ ऐवजी ३३ लाख
मागील नऊ महिन्यांपासून एसटीच्या उत्पन्नाची बाजू कमकुवत झाली आहे. पूर्ण लाॅकडाऊन असताना एसटीची चाके थांबली होती. यानंतर काही क्षमतेने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली. या काळात मोठा आर्थिक दणका एसटीला बसला. आताही दररोज १२ लाख रुपये कमी उत्पन्न महामंडळाला मिळते.

हजेरी भरली जावी
चालक-वाहक कामगिरीवर येतात. मात्र, काही लोकांना स्पेअरमध्ये ठेवले जाते. कामगिरी नसल्यास परत पाठविले जाते. अशावेळी त्यांना रजा घ्यावी लागते. त्यांचे आर्थिक नुकसान होते. महामंडळाने कामावर हजर झालेल्या कामगारांची हजेरी भरून द्यावी.
- राहुल धार्मिक, विभागीय सचिव,
 एसटी कामगार संघटना

पूर्ण क्षमतेने वाहतूक
यवतमाळ आगारातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू आहे. सोबतच माल वाहतूक करण्यासाठीही कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे यवतमाळ आगारात सर्वच चालक-वाहकांना कामगिरी दिली जाते. ग्रामीण भागातील सर्वच मार्गांवरही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
- विवेक बनसोड, 
आगार प्रमुख, यवतमाळ

Web Title: Passengers return to the bus stops, however, less the turn of the ST, hitting the driver-carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.