रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:17 PM2018-02-04T22:17:44+5:302018-02-04T22:18:02+5:30

रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक आणि अधिकाधिक चांगली सेवा देण्यात येईल, असा संकल्प प्रख्यात अस्थिव्यंग उपचार तज्ज्ञ डॉ. अजित फडके यांनी व्यक्त केला.

 Patients will be treated with dignity | रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल

रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल

Next
ठळक मुद्दे अजित फडके : क्रिटिकेअरचे नवे एमडी म्हणून पदभार स्वीकारला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक आणि अधिकाधिक चांगली सेवा देण्यात येईल, असा संकल्प प्रख्यात अस्थिव्यंग उपचार तज्ज्ञ डॉ. अजित फडके यांनी व्यक्त केला.
हिराचंद मुणोत मेमोरियल क्रिटिकेअर रुग्णालयाचे नवे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून डॉ. फडके यांची सर्वानुमते निवड झाली. मावळते एमडी डॉ. टी. सी. राठोड यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हृदयरोग तज्ज्ञ तथा ज्येष्ठ संचालक डॉ. भालचंद्र वाघ होते. व्यासपीठावर संचालक मंडळाचे सदस्य डॉ. विजय ठाकरे, डॉ. दिलीप कारिया, डॉ. एन. के. पुराणिक, डॉ. आशीष तावडे, डॉ. सचिन बेले आदी उपस्थित होते. तज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे यावेळी डॉ. राठोड यांनी सांगितले. रुग्णालयाद्वारे गेल्या वर्षभरात पुरविण्यात आलेल्या विविध सेवांची माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन मुख्य लेखाधिकारी आनंद पसारी यांनी केले. डॉ. क्षमा तिवारी यांनी आभार मानले. डॉ. सी. बी. अग्रवाल, डॉ. सतीश चिरडे, सनदी लेखापाल नीरज अग्रवाल, डॉ. ओमप्रकाश सिंघानिया, डॉ. रवी साबू, डॉ. नीलेश येलनारे, डॉ. प्रशांत कसारे, डॉ. कल्पना पटवर्धन आदी उपस्थित होते.

Web Title:  Patients will be treated with dignity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.