देशभक्तीपर समूह गीत स्पर्धा
By admin | Published: January 9, 2016 02:50 AM2016-01-09T02:50:50+5:302016-01-09T02:50:50+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी स्मृती देशभक्तीपर....
प्रेरणास्थळ आयोजन समिती : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी स्मृती देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेचे आयोजन गणराज्य दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळात येथील ‘प्रेरणास्थळ’ वर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणास्थळ आयोजन समिती आणि हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्यावतीने करण्यात आले आहे.
गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळात ही स्पर्धा होणार आहे. एकाच गटात होणाऱ्या या स्पर्धेत प्रवेश नि:शुल्क आहे. सहभागी चमूंना सादरीकरणासाठी सात मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक समूहात स्पर्धक संख्या गायक दहा तर पाच साथीदार असावे. सहभागी सर्व गायक स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम बक्षीस १,५०० रुपये, द्वितीय बक्षीस १,००० रुपये, तृतीय बक्षीस ७५१ रुपये देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १७ जानेवारी २०१६ पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागेल. सोबत सहभागी स्पर्धकांचे ओळखपत्र किंवा शाळेच्या लेटर हेडवर यादी द्यावी लागेल. दिल्या गेलेल्या क्रमानुसारच गीत सादर करावे लागेल. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे अध्यक्ष किशोर दर्डा व प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी केले आहे.
या स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अजय कोलारकर (८८०५८८५६६८) व सहकार्यक्रम अधिकारी सुहास तिवस्कर (९४२३१३५२५८) यांच्याशी
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
(उपक्रम प्रतिनिधी)