पाथ्रडच्या स्वस्त धान्य दुकानाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 09:15 PM2019-01-03T21:15:13+5:302019-01-03T21:19:20+5:30
तालुक्यातील पाथ्रड गोळे येथील स्वस्त धान्य दुकानाची थेट उच्च न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी केली जात आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी स्वत: गावात जावून ग्रामस्थांचे बयाण घेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यातील पाथ्रड गोळे येथील स्वस्त धान्य दुकानाची थेट उच्च न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी केली जात आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी स्वत: गावात जावून ग्रामस्थांचे बयाण घेत आहे.
पाथ्रड गोळे येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना सपना हरीदास मेश्राम यांच्या नावाने आहे. गावातील लाभार्थ्यांना परवानाधारकांकडून योग्य वागणूक मिळत नाही तसेच मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार २०१४ मध्ये झाली होती. या तक्रारीवरून नेरच्या तत्कालिन तहसीलदारांनी चौकशी करून अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे पाठविला होता. नंतर हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे पोहोचले. तेथून नागपूर उच्च न्यायालयात अपील करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गावात जावून कार्डधारकांचे बयान नोंदविण्याचे निर्देश दिले. ही कारवाई करण्यासाठी पुरवठा अधिकाऱ्याचे पथक गावात दाखल झाले. यावेळी सरपंच सविता अडमाते, पोलीस पाटील प्रफुल्ल नेरकर, तलाठी येळणे, परवानाधारक सपना मेश्राम, तक्रारदार प्रितम गावंडे, मुख्यमंत्री दूत किरण घोरपडे, बाबारावजी माकडे, हरीदास मेश्राम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारपर्यंत ७० कार्डधारकांचे बयान नोंदविण्यात आले होते.