लोकसहभागातून करंजखेडचे झाले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:34 PM2018-02-16T23:34:59+5:302018-02-16T23:35:15+5:30

गावाला योग्य नेतृत्व मिळाले तर गावाचे कसे नंदनवन होऊ शकते, याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महागाव तालुक्यातील चार हजार लोकवस्तीच्या करंजखेडमध्ये यावे लागेल. सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर प्रवीण ठाकरे यांनी गावाचा कायापालटच केला.

People have joined Karnajkhed from Parbandhund | लोकसहभागातून करंजखेडचे झाले नंदनवन

लोकसहभागातून करंजखेडचे झाले नंदनवन

googlenewsNext
ठळक मुद्देविकासाचा ध्यास : सरपंच प्रवीण ठाकरे ठरले ‘लोकमत सरपंच आॅफ द इअर’

संजय भगत।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : गावाला योग्य नेतृत्व मिळाले तर गावाचे कसे नंदनवन होऊ शकते, याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महागाव तालुक्यातील चार हजार लोकवस्तीच्या करंजखेडमध्ये यावे लागेल. सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर प्रवीण ठाकरे यांनी गावाचा कायापालटच केला.
अशा या सरपंचाच्या कार्याचा गौरव ‘लोकमत’ने सरपंच आॅफ द इअर पुरस्कार देऊन केला.
महागावपासून अवघ्या पाच किलोमीटरवर करंजखेड आहे. माहूर दर्शनासाठी जाणाºया भक्तांच्या विश्रांतीचे हे ठिकाण. या ठिकाणी भक्तांना हमखास भोजन आणि निवास उपलब्ध होतो. त्यामुळेच वर्षभर दिंड्या करंजखेडवरूनच जातात. या गावातील ठाकरे कुटुंब या भक्तांसाठी सर्व व्यवस्था करतात. अशा या सेवाव्रती ठाकरे कुटुंबातील तिसºया पिढीचे वारस म्हणजे गावचे विद्यमान सरपंच प्रवीण ठाकरे. त्यांनी बीए, डीएड केले. परंतु नोकरीच्या मागे न लागता ग्रामविकासासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केले ते जल व्यवस्थापनावर. तळ्यातील दहा हजार ब्रास गाळ लोकसहभागातून काढला. त्यामुळे पाण्याची समस्या चुटकीसरशी मिटली. त्यांच्या या कार्याचा जिल्हा परिषदेने गौरव केला. नंतर त्यांनी सौरऊर्जेचे महत्त्व गावकºयांना समजून सांगितले. त्यातून अनेक शेतकºयांनी सौरपंप उभारले. वीज बचतीसाठी गावात एलईडी लाईट लावली. त्यामुळे ७० टक्के वीज झाली. गावात डिजिटल शाळा साकारली. लोकवर्गणीतून गोळा झालेल्या दोन लाखातून डिजिटल प्रोजेक्टर बसविण्यात आले.
स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र देत त्यांनी तरुणांना एकत्र केले. गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करून गावाची वाटचाल स्मार्ट ग्रामकडे सुरू झाली. आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, ई-प्रशासन आणि रोजगार निर्मिती असे उपक्रम राबविले. कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. करंजखेड ग्रामपंचायतीअंतर्गत ५९३ हेक्टर शेती असून यातील ४० टक्के शेती ओलिताखाली आहे.
करंजखेडने तंटामुक्तीचा तीन लाखांचा पुरस्कारही प्राप्त केला आहे. गावात दारूबंदीचा ठराव एकमताने पारित करून गाव शंभर टक्के व्यसनमुक्त करण्यात आले. सरपंच ठाकरे यांच्या या उपक्रमात संदीप ठाकरे, उपसरपंच भरोस चव्हाण, अविनाश भांगे, बच्चू राठोड, सुमन जाधव, मंदा भांगे, कलाबाई भांगे, हरिभाऊ ठाकरे, लक्ष्मीबाई बोरकर, दीपाली भांगे, विनोद चौधरी, अविनाश ठाकरे, प्रवीण भांगे, भीमराव भालेराव, योगीता तांबूतकर आणि गावकरी सहकार्य करतात. समन्वयाचे काम ग्रामसेवक के.पी. घारड करतात.
पर्यावरण संवर्धनाचा मंत्र
डोंगरदऱ्यांत वसलेल्या करंजखेड येथील गावकऱ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळेच आता गावातील प्रत्येक घरी गॅस कनेक्शन आहे. परिणामी जंगलतोड थांबली आहे. दरवर्षी ५०० वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन केले जाते.
ग्रामसभेला सर्वोच्च प्राधान्य
करंजखेड येथे कोणतेही काम करायचे असल्यास ग्रामसभा घेतली जाते. नागरिकांनी सूचविलेल्या कामांना प्राधान्य दिले जाते. कामात कोणती अडचण आल्यास सर्व मिळून ते सोडविले जाते. जिल्ह्यातील हे आदर्श गाव आता राज्यस्तरावर पोहोचावे, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.

Web Title: People have joined Karnajkhed from Parbandhund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.