यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबनवासियांनी जपली अशीही माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 07:34 PM2020-12-14T19:34:20+5:302020-12-14T19:34:42+5:30

Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्याच्या मुकुटबन वासियांनी माणुसकीचा नवीन आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

The people of Mukutban in Yavatmal district also showed such humanity | यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबनवासियांनी जपली अशीही माणुसकी

यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबनवासियांनी जपली अशीही माणुसकी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : कोरोना काळात माणूस माणसाला विसरला . अगदी आपल्या आप्तेष्ठांची  शव अंत्यसंस्कारास  स्वीकारले  नाही. अशी अनेक उदाहरणे गेल्या नऊ महिन्यात समोर आली आहेत . पण यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्याच्या मुकुटबन वासियांनी माणुसकीचा नवीन आदर्श समाजासमोर ठेवला आहे . एक अनाथ गेल्या २५ वर्षांपूर्वी मुकुटबन येथे आला . त्याला मुकुटबन वासियांनी मायेची पाखर दिली . भीक मागून तो आपला चरितार्थ चालवत होता .गेल्या दोनदिवसांपूर्वी अचानक त्याची प्रकृती बिघडली . ग्राम वासियांनी त्याला रुग्णालयात भरती केले, पण  त्याचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला . मग मुकुटबन वासियांनी त्याची शवयात्रा काढली . संपूर्ण गाव त्याच्या अंतिम यात्रेसाठी आले होते . आधुनिक जीवनात कुठेतरी माणुसकी हरविली असल्याचा प्रत्येय येतो पण मुकुटबन वासियांनी माणुसकी  अजूनही जिवंत आहे याचा प्रत्यय आणून दिला.

Web Title: The people of Mukutban in Yavatmal district also showed such humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.