पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांची कायम पट्ट्यासाठी कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:28 IST2018-06-13T22:28:13+5:302018-06-13T22:28:13+5:30
कायमस्वरूपी पट्ट्याच्या मागणीसाठी झरी तालुक्यातील नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांची कायम पट्ट्यासाठी कचेरीवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कायमस्वरूपी पट्ट्याच्या मागणीसाठी झरी तालुक्यातील नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
झरी तालुक्यातील हिवरा बारसा, कारली बोरगाव, पार्डी, पालगाव, बोटोणी या गावातील नागरिकांनी कायमस्वरूपी पट्टयाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी नागरिकांनी २० वर्षांपासून वनजमीन कसणाऱ्या आदिवासी बांधवांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी केली. जे नागरिक अतिक्रमण करून जमीन कसत आहेत. ते भूमिहीन आहेत, त्यांना उदरनिर्वाहासाठी कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे. अशी मागणी यावेळी केली. नुकत्याच पार पडलेल्या आंदोलनात मुख्यमंत्र्यांनी अशा आदिवासी बांधवांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचे मान्य केले होते. त्या नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी केली.
यावेळी प्रहार संघटनेच्या आर्णी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख अजय घोडाम, जिल्हा संघटक रवी राऊत, विद्यार्थी प्रमुख सुभाष टेकाम, नयाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सुरपाम, कैलास आत्राम, पैकुजी आत्राम, लक्ष्मण पेंदोर, लचमा कोहचडे, मारोती पेंदोर, अय्या टेकाम यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.