पिकांवर येणारी कीड हे शास्त्रज्ञांचे अपयशच..! अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 17:31 IST2024-08-17T17:28:29+5:302024-08-17T17:31:59+5:30
Yavatmal : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विधान

Pests on crops are the failure of scientists..! Amrit Rao Deshmukh, the father of Amrit Pattern, expressed his displeasure
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : सोयाबीनवर येलो मोडॉक आणि कापसावर खोड कीड सध्या आलेली आहे. हा रोग आजचा नाही गेल्या पाच- सात वर्षापासून हे संकट आहे. यावर संशोधन व्हायला पाहिजे तसे होत नाही. सोयाबीनवर येलो मोॉक तर कपाशीवर बोंडसड हे शास्त्रज्ञांचे अपयश आहे, अशी टिका अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते सोयाबीन पीक घेवून आले होते.
दरवर्षी शेतकरी या रोगापासून त्रस्त आहे. महागाव तालुक्यात मागील वर्षी यामुळे ४० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागानेच वर्तवला होता. तरी पण तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. चालू हंगामामध्ये पीक परिस्थिती वरवर चांगली असली तरी सोयाबीन पिकावर येलो मोझेंक आणि कापसावर बोंड सड आलेली आहे. यावर कृषी विभागाने ग्राम स्तरावर शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. उलट चालू हंगामामध्ये पीक परिस्थिती चांगली असल्याचा अहवाल शासनाला सादर केला. हा प्रकार हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याची टिका अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी केली.
येलो मोडॉक हा काही एका दिवसात येणारा रोग नाही तो येणार असल्याची पूर्वकल्पना पीक परिस्थितीवरून येते, तरीही कृषी विभागाचे अधिकारी, शास्त्रज्ञ उपाययोजना सांगत नाहीत है दुर्दैव असल्याचे सांगत येलो मोड़ॉक का येतो, त्यावर संशोधन का केले जात नाही. कापसावर बोंड आळी आली म्हणून कृषी विभागाचे अधिकारी सांगत असतात वास्तविक ही बोंड आळी नाही ते बोंडसड आहे. बोंड आळी ही बोंडावर तयार होते तर बोंड सड ही बोंडाच्या आतील भागात तयार होते यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे, असे मतही देशमुख यांनी व्यक्त केले.