छायाचित्रकार तरुणाचा घाटंजीत निर्घृण खून

By Admin | Published: February 26, 2017 01:09 AM2017-02-26T01:09:07+5:302017-02-26T01:09:07+5:30

पूर्ववैमनस्यातून छायाचित्रकार युवकाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता येथील प्रोफेसर कॉलनीत घडली.

The photographer thrived in the throats, bloodless blood | छायाचित्रकार तरुणाचा घाटंजीत निर्घृण खून

छायाचित्रकार तरुणाचा घाटंजीत निर्घृण खून

googlenewsNext

घाटंजी : पूर्ववैमनस्यातून छायाचित्रकार युवकाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता येथील प्रोफेसर कॉलनीत घडली. अक्षय तुषार भोरे (२२), असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अक्षय हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री आपले जुन्या बसस्थानकानजिक असलेले फोटो स्टुडीओचे दुकान बंद करून दुचाकीने प्रोफेसर कॉलनीतील घराकडे निघाला होता. प्रोफेसर कॉलनीमध्ये दबा धरून बसलेल्या अक्षय ऊर्फ बक्सा संतोष मस्कर (२२), चेतन सुखदेव टेकाम (२७), आकाश संतोष मस्कर (२७) तिघेही रा.घाटंजी, यांनी अक्षय भोरे याच्यावर मागाहून येत हल्ला केला. डोक्यावर लोखंडी रॉड मारून त्याला खाली पाडले. गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तत्काळ येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अक्षय आणि सदर तिनही आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याचा वचपा काढण्यात आल्याचे सांगितले जाते. घटनेतील अक्षय मस्कर व आकाश मस्कर हे दोघे भाऊ आहेत. या तीनही आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश भावसार, उपनिरीक्षक नीलेश उरकुडे करीत आहे.
पोलीस उपनिरीक्षक पुप्पुलवार, उपनिरीक्षक डोंगरे, सुनील केवट, गणेश घोसे, गणेश आगे, जुनेद, सुनील दुबे, रितेश श्रीवास, मोहन कन्नाके, सुरेश गेडाम आदींनी घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणली. (लोकमत चमू)

Web Title: The photographer thrived in the throats, bloodless blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.