फुले-आंबेडकरी आंदोलन मानवतेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:57 PM2018-04-12T21:57:42+5:302018-04-12T21:57:42+5:30

भारतातील सहा लाख गावातून वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने फुले-आंबेडकरी आंदोलन चालविले जाते. गत १५० वर्षात या गावांमधून साधारणत: १०० महापुरुष निर्माण झाले. भारतातील सर्व आंदोलने यात समाविष्ट होतात.

 The Phule-Ambedkari Movement of Humanity | फुले-आंबेडकरी आंदोलन मानवतेचे

फुले-आंबेडकरी आंदोलन मानवतेचे

Next
ठळक मुद्देसत्नाम सिंग : यवतमाळच्या समता पर्व - २०१८ मध्ये मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारतातील सहा लाख गावातून वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने फुले-आंबेडकरी आंदोलन चालविले जाते. गत १५० वर्षात या गावांमधून साधारणत: १०० महापुरुष निर्माण झाले. भारतातील सर्व आंदोलने यात समाविष्ट होतात. दलित, आदिवासी, मुस्लीम, अन्यायग्रस्त लोकांचे जनाधार असलेले हे आंदोलन सर्वात विशाल आणि सक्रिय आंदोलन आहे. जाती, धर्म, वर्ग, संप्रदाय विरहित हे मानवतेचे आंदोलन होय, असे प्रतिपादन दिल्ली येथील विचारवंत सत्नाम सिंह यांनी केले.
येथील समता मैदानावर (पोस्टल मैदान) आयोजित समता पर्व - २०१८ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘फुले-आंबेडकरी समाज आंदोलन का स्वरूप और समाज की भागीदारी का प्रश्न’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप घावडे होते. उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे यांच्या हस्ते करण्यात आले. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, इतरांकडून सेवा करून घेण्याचा ईश्वरदत्त अधिकार आहे, माणसांना माणुसकीची वागणूक न देता अतिशय हिन-दिन पद्धतीने अपमानित जीवन जगण्यास भाग पाडणाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू झाले आहे, असे ते म्हणाले.
जाती, धर्म, रंग, लिंग आणि जन्मस्थान यावरून माणसामाणसात भेदभाव निर्माण करणाºया विचारसरनीला विरोध करणे मानवतावादी दृष्टीकोणातून सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी यवतमाळ आयडॉलची प्रथम फेरी करण्यात आली. या स्पर्धेचे संचालन प्रवीण पाईकराव व स्नेहल नगराळे यांनी केले. उषा मोर आणि रुद्रकुमार रामटेके परीक्षक होते. यावेळी सिद्धार्थ भवरे, सोमेश्वर कुंभारे, गणेश राठोड, अनिल आडे, अशोक वानखडे, अनिल खंदारे, घनश्याम भारशंकर, रामदास चंदनकर, वसंत नारनवरे, पंकज होडकर उपस्थित होते. प्रास्ताविक अ‍ॅड. अरुण मोहोड यांनी, संचालन प्रा.डॉ. चंद्रकांत सरदार यांनी तर आभार विजय मालखेडे यांनी मानले.
 

Web Title:  The Phule-Ambedkari Movement of Humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.