उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी

By admin | Published: June 8, 2014 12:11 AM2014-06-08T00:11:00+5:302014-06-08T00:11:00+5:30

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस शिपायांच्या सुमारे ३00 पदांसाठी भरती पक्रिया घेतली जात आहे. या भरतीप्रक्रियेची शारीरिक क्षमता चाचणी येथील पळसवाडी पोलीस मैदानावर सुरू आहे.

Physical ability test of candidates | उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी

उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी

Next

पोलीस भरती : कायमस्वरूपी रोजगारासाठी सत्वपरिक्षा, तप्त उन्हातही उत्साह कायम
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस शिपायांच्या सुमारे ३00 पदांसाठी भरती पक्रिया घेतली जात आहे. या भरतीप्रक्रियेची शारीरिक क्षमता चाचणी येथील पळसवाडी पोलीस मैदानावर सुरू आहे. चाचणीच्या दुसर्‍या दिवशी अडीच हजार उमेदवारांनी त्यामध्ये सहभाग घेतला. जास्तीत जास्त गुण मिळावे म्हणून तप्त उन्हातही शारीरिक क्षमतेचे कसब करण्यात उमेदवार उत्साही होते. शारीरिक क्षमता चाचणी तर परीक्षेचा भाग आहे. मात्र त्यासाठी तप्त ऊन अंगावर झेलत उमेदवार    कायमस्वरूपी रोजगारासाठी सत्वपरिक्षाच देत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
 जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार यांच्या नेतृत्वात ही भरतीप्रक्रिया घेतली जात आहे. प्रथमच यवतमाळ जिल्हा पोलीस दलात ३00 शिपायांची म्हणजेच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पदभरती घेतली जात आहे. भरती प्रक्रियेच्या शारीरिक क्षमता चाचणीच्या पहिल्या दिवशी एक हजार ५00 उमेदवारांना बोलाविण्यात आले. मात्र ८५0 उमेदवारांनीच हजेरी लावली. दुसर्‍या दिवशी म्हणजेच शनिवारी दोन हजार ५00 उमेदवारांना बोलाविण्यात आले. त्यापैकी किती उमेदवारांनी पक्रियेत सहभाग घेतला. याचा आकडा सायंकाळी उशिरापर्यंत कळू शकलेला नव्हता.
१00 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी आणि पुलअपचे १00 गुणांसाठी उमेदवारांकडून कसब करून घेतले जात होते. तप्त उन्हाच्या तडाख्यात दोन दिवसांपासून घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. मात्र भर उन्हात नोकरी पदरात पाडून घेण्यासाठी मैदानी कसब करण्यात उमेदवारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. भरतीत एखाद्या उमेदवाराला झुकते माप दिले जावू नये अथवा गैरप्रकार होवू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे खुद्द भरती प्रक्रियेत कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवून होते. शिवाय पोलीस कर्मचार्‍यांकडून प्रत्येक क्रीडा प्रकाराचे आणि सहभागी उमेदवारांचे व्हीडीओ चित्रीकरण केले जात होते. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने त्यातही मैदानावरील प्रत्येक बाब टिपली जात होती. (स्थानिक प्रतिनिधी)
 

Web Title: Physical ability test of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.