खांबामुळे वाहतुकीला व रस्ता बांधकामाला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:44 AM2021-08-23T04:44:05+5:302021-08-23T04:44:05+5:30
वीज वितरण कंपनीने हे खांब न हटविल्यामुळे रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सध्या बंद आहे. ...
वीज वितरण कंपनीने हे खांब न हटविल्यामुळे रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सध्या बंद आहे. खैरी-मार्डी-नांदेपेरा या २२ किलोमीटर राज्य मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत काम चालू आहे. मार्डी गावातून जाणाऱ्या रस्त्याकरिता ५०० मीटर सिमेंट रस्त्याची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्याचे रुदीकरण झाले असून सिमेंट कॉंक्रीटच्या कामाला सुरुवात झाली आहे. परंतु रस्त्यात असलेले महावितरणचे विद्युत खांब वाहतुकीला धोकादायक ठरत असून बांधकामालासुद्धा यामुळे अडथळा आलेला आहेे. त्यामुळे सध्या काँक्रिटीकरणाचे काम बंद आहें. वीज कंपनीकडून रस्त्यावरील विद्युत खांब हटविल्याशिवाय आणि रस्त्यात असलेली झाडे तोडल्याशिवाय रोडचे काम पूर्णत्वास जाणार नाही. त्यामुळे रहदारीला अडथळा ठरणारे विद्युत खांब, झाडे हटविण्याबाबत संबंधित विभागाकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे.