गुलाबी बोंडअळीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 09:51 PM2017-11-01T21:51:05+5:302017-11-01T21:55:25+5:30
बोंडअळीमुळे कपाशीच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी विशेष शासन निर्णय घेतला जाईल, असे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बुधवारी येथे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मांगलादेवी : बोंडअळीमुळे कपाशीच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी विशेष शासन निर्णय घेतला जाईल, असे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बुधवारी येथे सांगितले. नुकसानग्रस्त शेताची पाहणी किशोर तिवारी यांनी केली.
मांगलादेवीसह कुºहेगाव, चिखली (कान्होबा), मांगुळ, टाकळी (सलामी), ब्राह्मणवाडा (पूर्व) आदी गावातील कपाशी पिकाचे गुलाबी बोंडअळीने नुकसान झाले. मांगलादेवी येथील ललिता मुरलीधर उघडे, पद्माकर ढोमणे, सुनील ढेंगे यांच्या शेताची त्यांनी पाहणी केली. विशेष जीआर काढून शेतकºयांना बीटी कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवून देवू, असे आश्वासन तिवारी यांनी दिले. बीटीचे निर्माते व विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. भाजपा तालुकाध्यक्ष पंजाबराव शिरभाते, सुनील घोटकर, राजेंद्र देऊळकर, योगेश दहेकर आदी उपस्थित होते.
प्रयोगशील शेतकºयांनी मांडली व्यथा
मांगलादेवी येथील श्याम उघडे व सुनील ढेंगे यांची प्रयोगशील शेतकरी म्हणून परिसरात ओळख आहे. अपार कष्ट करून ते चांगले उत्पन्न घेतात. यावर्षी त्यांनी कपाशीचे पीक घेतले. मात्र गुलाबी बोंडअळीने हाती आलेले पीक गेले. बियाणे कंपन्यांनी फसवणूक केली. आता जगण्याचा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला, अशी व्यथा त्यांनी शेताची पाहणी करण्यासाठी आलेल्या नेत्यांपुढे मांडली.
ख्वाजा बेग, संदीप बाजोरियांकडून पाहणी
मांगलादेवी परिसरातील गुलाबी बोंडअळीग्रस्त शेताची बुधवारी आमदार ख्वाजा बेग यांनी पाहणी केली. ललिता उघडे यांच्या शेतात जावून वास्तव जाणून घेतले. झालेले नुकसान आणि मदतीचा प्रश्न शासन दरबारी रेटून धरला जाईल, शक्य तितकी अधिक मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे ख्वाजा बेग यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार संदीप बाजोरिया, क्रांती धोटे, वसंत घुईखेडकर, नानासाहेब भोकरे, युवराज अर्मळ, भरत कुंभारखाने, सुनील खाडे, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित होते.