पºहाटीच्या बोंडात गुलाबी अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:18 PM2017-10-27T23:18:23+5:302017-10-27T23:18:56+5:30

जिल्ह्यात पºहाटीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. या किडीच्या प्रादूर्भावाने कापसाच्या उत्पादनात घट होत आहे.

Pink larvae in the high-rise bunda | पºहाटीच्या बोंडात गुलाबी अळ्या

पºहाटीच्या बोंडात गुलाबी अळ्या

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची शिवसेनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात पºहाटीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. या किडीच्या प्रादूर्भावाने कापसाच्या उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे बोंडअळीच्या आक्रमणाचे सर्वेक्षण करून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख पराग पिंगळे व सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी विकास अधिकाºयांना निवेदन देऊन केली.
गुरूवारी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नेर तालुक्यात मांगलादेवी, मांगूळ, टाकळी सलामी, ब्राह्मणवाडा, चिखली, सिंदखेड आदी गावांमध्ये वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या काही शेताची पाहणी केली. तेव्हा बीटी बियाण्यांची लागवड केलेल्या पºहाटीच्या बोंडात कापसाऐवजी गुलाबी अळ्या निघत असल्याचे आढळले. संजय राठोड यांनी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी विभागाचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून शेतकºयांवरील संकटाची माहिती दिली. तसेच याविषयी शनिवार, २८ आॅक्टोबर रोजी जिल्हा कृषी विकास अधिकाºयांची बैठकही बोलाविली आहे. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकाºयांना ही किडलेली बोंड प्रत्यक्ष दाखवून पंचनामा व नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. यावेळी रविकिरण राठोड, अरूण राऊत, भीमराव खोब्रागडे, धर्मपाल घरडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Pink larvae in the high-rise bunda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.