पिण्याचे पाणी व हाताला कामाचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 09:47 PM2019-05-13T21:47:31+5:302019-05-13T21:47:52+5:30

ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा-छावणी मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले.

Plan for drinking water and hand job | पिण्याचे पाणी व हाताला कामाचे नियोजन करा

पिण्याचे पाणी व हाताला कामाचे नियोजन करा

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या सूचना : जिल्ह्यातील सरपंचांसोबत ‘आॅडिओ ब्रिज’द्वारे संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा-छावणी मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले.
मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी ‘आॅडिओ ब्रीज’च्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधून पाणी टंचाई आणि रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले, काही ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रमाणे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाण्याची व्यवस्था करावी. सरपंचांनी मागणी केल्याप्रमाणे पाण्याच्या बाबतीतील सर्व प्रस्ताव तातडीने मंजूर करावे. पिण्यासाठी जनावरे आणि ग्रामस्थांना पाणी मिळेल तसेच ग्रामस्थांना रोजगार हमीची कामे मिळतील याकडे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे.
मुुख्यमंत्री यांच्या संवाद सेतू कार्यक्रमात त्यांनी जवळपास ४० सरपंचांशी संवाद साधला. पाण्याची टाकी बांधणे, नळपाणी पुरवठा योजनेची अर्धवट कामे पूर्ण करावी, सिंचन विहिरी आणि हातपंपांची दुरुस्ती करावी, प्रस्तावित नळ योजनांना मंजुरी द्यावी, रोहयोची कामे सुरु करावी, टँकरचा पाणी पुरवठा करावा अशाप्रकारच्या मागण्या प्रामुख्याने सरपंचांनी मांडल्या. मुख्यमंत्री यांनी या सर्व मागण्या जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर्ण करण्याबाबत लक्ष घालण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकणी, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता मडावी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आडे, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, उपजिल्हाधिकारी (नरेगा) संगीता राठोड तसेच तालुक्याच्या ठिकाणी संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.
सरपंच दुष्काळग्रस्त तालुक्यातील
दुष्काळग्रस्त तालुक्यातील मीनाक्षी सुकडे, ललिता टोणे, पंकज लगडे, अजय गाडगे, वसंत जाधव, सुनील चव्हाण, सुधाकर साळूंके, जयश्री खंडारे, अंकुश मुनेश्वर, उमेश राऊत, रमेश दवणे यांच्यासह जवळपास ४० सरपंचांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

Web Title: Plan for drinking water and hand job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.