नियोजन आराखडा २५३ कोटींचा, खर्च २३ कोटी
By admin | Published: November 19, 2015 03:02 AM2015-11-19T03:02:19+5:302015-11-19T03:02:19+5:30
जिल्ह्याच्या विकासासाठी २५३ कोटींचा नियोजन तयार करण्यात आले होते. मात्र यापैकी केवळ आतापर्यंत २३ कोटी रुपयेच खर्च झाले.
जिल्हा नियोजन : चार महिन्यात २३० कोटींच्या खर्चासाठी कसरत
यवतमाळ : जिल्ह्याच्या विकासासाठी २५३ कोटींचा नियोजन तयार करण्यात आले होते. मात्र यापैकी केवळ आतापर्यंत २३ कोटी रुपयेच खर्च झाले. त्यामुळे उर्वरित २३० कोटी रुपये खर्च आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी करण्यास प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
जलयुक्त शिवार, जन सुविधा योजनेतून सुचविण्यात आलेली काम. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील रस्ते, वनविभागांची कामे, पर्यटन विकास, नाविण्यपूर्ण योजना, कृषी व संलग्न सेवा, सामाजिक सेवा आणि ऊर्जा याकामा करीता २०१५-१६ या वर्षामध्ये २५३ कोटी ७१ लाख रूपयांचा निधी खर्ची घातला जाणार आहे. त्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला. यापैकी केवळ २३ कोटींचा निधी खर्च करण्यात आला. उर्वरित २३० कोटींचा निधी मान्यतेविना अखर्चित राहीला होता. याला जिल्हा नियोजनाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
आठ महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाच्या निधीला मंजूरी मिळाली. मात्र चार महिन्यात २३० कोटींचे कामे करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. (शहर वार्ताहर)