शहिदांच्या पित्यांनी केले पिंपळाचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 09:17 PM2019-10-07T21:17:56+5:302019-10-07T21:19:09+5:30
दक्षीण आर्णी वनपरिक्षेत्रातील कृष्णनगर येथे शहीद ज्ञानेश्वर आडे, शहीद साहेबराव चव्हाण यांचे स्मारक आहे. या स्मारक परिसरात त्यांचे वडील गोविंदराव आडे व गंगाराम चव्हाण यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासाठी खास सेवाग्राम येथून पिंपळ वृक्षाचे रोपटे आणण्यात आले. सेवाग्राम येथे महात्मा गांधी १९३६ मध्ये यांनी त्या पिंपळ वृक्षाची लागवड केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : कृष्णनगर येथे शहीद स्मारकाच्या ठिकाणी दक्षीण आर्णी वनपरिक्षेत्राअंतर्गत सेवाग्राम येथून आणलेल्या पिंपळ झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे तालुक्यातील शहीद झालेल्या जवानांच्या पित्यांनी वृक्षारोपण केले.
दक्षीण आर्णी वनपरिक्षेत्रातील कृष्णनगर येथे शहीद ज्ञानेश्वर आडे, शहीद साहेबराव चव्हाण यांचे स्मारक आहे. या स्मारक परिसरात त्यांचे वडील गोविंदराव आडे व गंगाराम चव्हाण यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासाठी खास सेवाग्राम येथून पिंपळ वृक्षाचे रोपटे आणण्यात आले. सेवाग्राम येथे महात्मा गांधी १९३६ मध्ये यांनी त्या पिंपळ वृक्षाची लागवड केली होती. त्या झाडापासून सामाजिक वनीकरण विभागाने रोपटी तयार केली. तीच ही रोपटी आहे. कृष्णनगर येथे दोन्ही स्मारक परिसरात प्रत्येकी चार रोपटी लावण्यात आली. वनपरीक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी हा आगळावेगळा उपक्रम राबविला. शहीदांचे पिता गोविंदराव आडे व गंगाराम चव्हाण यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. पवन जाधव, श्रीनिवास गव्हाणे, प्रा.यादव राठोड, विनोद चव्हाण, सुनील पवार, नीलेश चव्हाण, शेंडे, गावकरी, वनाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.