रंग खेळा पण जरा जपूनच..

By admin | Published: March 6, 2015 02:05 AM2015-03-06T02:05:53+5:302015-03-06T02:05:53+5:30

आपल्या सहकाऱ्याला लावलेला रंग अधिक काळ टिकावा म्हणून सवंगड्यांकडून होळीच्या दिवसांमध्ये चांगलाच प्रयत्न होतो. सहकाऱ्यांचा हा रंग त्वचेला घातक ठरू शकतो.

Play the color but just barely .. | रंग खेळा पण जरा जपूनच..

रंग खेळा पण जरा जपूनच..

Next

.रूपेश उत्तरवार यवतमाळ
आपल्या सहकाऱ्याला लावलेला रंग अधिक काळ टिकावा म्हणून सवंगड्यांकडून होळीच्या दिवसांमध्ये चांगलाच प्रयत्न होतो. सहकाऱ्यांचा हा रंग त्वचेला घातक ठरू शकतो. याचे कारणही तसेच आहे. कारण बाजारात आलेल्या पक्या रंगात रसायणाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळ रंग खेळतांना तो जरा जपूनच खेळावा लागणार आहे.
रंगपंचमीच्या पर्वावर बाजारात नानाविध रंग आहेत. यामध्ये काही रंग पक्के तर काही रंग मॅजिक कलर आहे. यासोबत गुलालही बाजारात आला आहे. गुलालामध्ये सुहासिक गुलाल बाजारात आला आहे.
रंगाचे हे विविध प्रकार बाजारात असले तरी स्वस्त दरात अधिक रंगणाऱ्या रंगालाच सर्वाधिक मागणी आहे. यामध्ये चमकीचे कलर, एमआयडीसी कलर नावाने प्रसिद्ध असलेल्या रंगांना सर्वाधिक मागणी आहे. हे रंग अधिक काळ टिकणारे रंग म्हणून ओळखले जातात.
रंग तयार करताना कंपन्या अधिक रंगण्यासाठी यामध्ये रसायणाचा अधिक वापर करतात. त्वचेसाठी अधिक रसायणांचा वापर घातक आहे. डोळ्याला याची इजा पोहचण्याचा धोका आहे. यातून अंधत्व येण्याचाही धोका असल्यचे तज्ज्ञ सांगतात.
गुलाल अथवा नैसर्गीक कलरच वापरा
रसायण युक्त रंगांची उधळण रंगपंचमीत घातक आहे. यामध्ये गुलालयुक्त रंग सुयोग्य मानले जातात. तोच सर्वाधिक सुरक्षित रंग आहे. यासोबतच पळस फुलांचा रंग उधळण्यासाठी सुयोग्य आहे. फुल कांडून त्याचा रंग तयार करण्याची पद्धती पूर्वी वापरली जात होती. मात्रा आता हा प्रकार होत नाही. थेट तयार कलर विकत घेतले जातात. याच ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होते. क्षणिक आनंदासाठी कुणालाही इजा पोहचू नये याची खबरदारी घेण्याची नितांत आवशकता आहे. काळजीपूर्वक होळी खेळल्यास या सणाचा आनंद प्रत्येकाचा व्दिगुणित होऊ शकते, याचा विचार होणे गरजेचे आहे.
अशी घ्या काळजी
रंग खेळण्यापूर्वी त्वचेला कुठलीही इजा होऊ नये म्हणून काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यामध्ये संपूर्ण अंगाला ग्लिसरीन, तेल, अथवा पोमिट लावावे. यामुळे समोरच्या व्यक्तीने लावलेला कलर थेट त्वचेवर प्रभाव करणार नाही. यातून त्वचा रखरखीत होणार नाही तसेच अंगावर पुरळ येणार नाही. त्वचेची जळजळ होण्याचा प्रकार थांबेल. डोक्यावर रंग टाकल्यास प्रथम डोके साफ करावे. अंगाचा कलर साध्या कापडाने पुसून घ्यावा. यामुळे अंगाची होणारी इजा टाळता येईल.
लहान मुलांना रंग लावू नका
चिमुकल्यांची त्वचा नाजूक असते. रंगाचा त्वचेवर परिणाम होतो. यासाठी चिमुकल्यांना रंग लागणार नाही, याची काळजी घेतली पाहीजे. रंगांपासून लहान मुलांना दूर ठेवण्यात यावे.

Web Title: Play the color but just barely ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.