पंतप्रधानांनी केली बचत गट महिलांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 10:51 PM2019-09-09T22:51:40+5:302019-09-09T22:54:03+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पहिल्यांदा बचत गटाच्या महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, लघुउद्योग उभारणी, घरबसल्या रोजगार यासारख्या घोषणा केल्या गेल्या. परंतु पाच वर्षात यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात साकारली गेली नाही. या घोषणा म्हणजे केवळ आश्वासने ठरल्या.

PM's savings group misleads women | पंतप्रधानांनी केली बचत गट महिलांची दिशाभूल

पंतप्रधानांनी केली बचत गट महिलांची दिशाभूल

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : दाभडी, पांढरकवडा पाठोपाठ औरंगाबादमध्येही खोटी आश्वासने

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी बचत गटाच्या गोरगरीब लाखो महिलांची कर्ज व निधीचे आमिष दाखवून दिशाभूल करीत आहेत. याच महिलांचा मग प्रचारातील गर्दी वाढविण्यासाठी वापर केला जातो. पांढरकवडा येथे १६ फेब्रुवारी रोजी याच महिलांचा आधार घेऊन प्रचारसभा यशस्वी केली गेली, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केला आहे.
अ‍ॅड. मोघे म्हणाले, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पहिल्यांदा बचत गटाच्या महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, लघुउद्योग उभारणी, घरबसल्या रोजगार यासारख्या घोषणा केल्या गेल्या. परंतु पाच वर्षात यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात साकारली गेली नाही. या घोषणा म्हणजे केवळ आश्वासने ठरल्या. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी १६ फेब्रुवारी २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आर्णी विधानसभा मतदारसंघात पांढरकवडा येथे सभा घेतली. या सभेतसुद्धा बचत गटाच्या महिलांना पुन्हा कर्ज, निधी यासारखी आश्वासने दिली गेली. त्यावरून सहा महिने लोटले. मात्र अद्याप या आश्वासनांची पूर्ती झालेली नाही. आता दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येसुद्धा मोदींनी पुन्हा बचत गटाच्या महिलांपुढे एक लाखापर्यंत कर्ज, जनधन खात्यात पाच हजाराचा ओव्हरड्राफ्ट आदी आश्वासने दिली. औरंगाबादमधील या मेळाव्यातून तर मोदींच्या फसव्या आश्वासनांची जणू पोलखोल झाली आहे. त्यांनी बचत गटाच्या महिलांना दिलेले कोणतेच आश्वासन पाळलेले नाही. उलट या आश्वासनांच्या बळावर सदर महिलांच्या गर्दीचा आपल्या सभा यशस्वी करण्यासाठी व गर्दी जमविण्यासाठी उपयोग केल्याचा आरोप मोघे यांनी केला आहे.

खोट्या आश्वासनांसाठी दाभडी-पांढरकवडाचा वापर
मोदी यांनी खोट्या प्रचार व दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांसाठी कायम यवतमाळ जिल्ह्यातील आणि विशेषत: आर्णी विधानसभा मतदारसंघातील भूमीचा वापर केला आहे. मोदींनी बचत गटाच्या महिलांचीच नव्हे तर देशातील तमाम जनतेचीसुद्धा प्रत्येकाच्या बँक खात्यता १५ लाख रुपये जमा करू, हे आश्वासन देऊन व त्याची पूर्तता न करून दिशाभूल केली आहे. बचत गटाच्या महिलांची दिशाभूल करून भाजपने लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविले. आर्णी मतदारसंघातसुद्धा याच बळावर भाजपला ५८ हजार मतांची लोकसभेत आघाडी मिळाली.

भाजप आमदारांना फटका
आता बचत गटाच्या महिलांचा मोदींच्या फसव्या आश्वासनामुळे गैरसमज दूर झाला असून विधानसभा निवडणुकीत बचत गटाच्या महिला मोदींच्या या फसव्या आश्वासनांना थारा देणार नाही, भाजपची ही पैशाची जादू आता चालणार नाही, असेही शिवाजीराव मोघे यांनी सांगितले. मोदींच्या या फसव्या आश्वासनांचा आगामी विधाससभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांना गावागावात मोठा फटका बसण्याची शक्यताही अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी वर्तविली आहे.

Web Title: PM's savings group misleads women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.