पळशी येथे ५० जनावरांना विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 06:06 PM2020-06-02T18:06:12+5:302020-06-02T18:07:56+5:30
दोन्ही विभागातील पथकाने पळशी येथे पोहोचून विषबाधा झालेल्या जनावरांवर उपचार केले. त्यामुळे जनावरांचे जीव वाचले.
दारव्हा (यवतमाळ) : तालुक्यातील पळशी येथे शेतातील ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने ५० जनावरांना विषबाधा झाली. वेळेवर उपचार करण्यात आल्याचे सर्व जनावरांचा जीव वाचविण्यात यश आले आहे. उन्हाळी ज्वारीची कापणी झाल्यावर शेतात शिल्लक असलेली फुटवे जनावरांनी खाल्ली. हिरव्या कोंबामध्ये हायड्रोजन सायनाईड नावाचे विष तयार होत असते. त्यामुळे जनावरांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत सरपंच शीतल दत्तात्रेय देशमुख यांनी तातडीने दारव्हा येथील लघु पशुचिकित्सालय तसेच पंचायत समितीला घटनेची माहिती दिली. दोन्ही विभागातील पथकाने पळशी येथे पोहोचून विषबाधा झालेल्या जनावरांवर उपचार केले. त्यामुळे जनावरांचे जीव वाचले.
लघु पशुचिकित्सालयातील सहायक आयुक्त डॉ. पी. पी. नेमाडे, डॉ. रशीद खान, पंचायत समितीचे पशु विकास अधिकारी डॉ. जी. के. चव्हाण, पशुधन पर्यवेक्षक डॉ. ब्रजेश शेख, संतोष कदम, यशवंत उघडे, अतुल इंगळे आदींनी जनावरांवर उपचार केले. दत्तात्रेय देशमुख, श्रीराम चव्हाण, विलास खोडके, विश्वनाथ खोडके, सुभाष खोडके, सुभाष राठोड, दारासिंग चव्हाण, मनोहर राऊत, गजानन भड, ज्ञानेश्वर राऊत, विलास कोरटकर, गणेश भड, विलास राठोड, अब्रार खान, अमान खान, मो. रशीद, सज्जाद खान, वाजीत खान, देवराव खंडारे आदींसह गावक-यांनी सहकार्य केले.