‘तो विषप्रयोग’ प्रेमसंबंधातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:26+5:30
गोदणी मार्गावर कँटीन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग रामदास ईश्वर दहीकर (४७) याचा पत्नीनेच विषप्रयोग करून खून केला. या घटनेत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. अवधुतवाडी पोलीस तपासाच्या दिशेने असतानाच टोळी विरोधी पथकाने आरोपी महिलेला अटक केली. या गुन्ह्याचा तपास अवधुतवाडी पोलीस नव्याने करत आहे. त्यामध्ये प्रेमसंबंधातून खून झाल्याचे पुढे आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एक वर्षापासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधात दिव्यांग पती अडसर ठरत असल्याने पत्नीने विषप्रयोग करत त्याला ठार केले. इतकेच नव्हे तर एक महिन्यापासून पतीची शारीरिक प्रकृती कमजोर करण्यासाठी त्याला अतिसाराच्या गोळ्या दिल्या जात होत्या, ही माहिती प्रियकराने अवधुतवाडी पोलिसांसमोर कबूल केली. या खुनाच्या गुन्ह्याला वेगळेच वळण असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
गोदणी मार्गावर कँटीन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग रामदास ईश्वर दहीकर (४७) याचा पत्नीनेच विषप्रयोग करून खून केला. या घटनेत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. अवधुतवाडी पोलीस तपासाच्या दिशेने असतानाच टोळी विरोधी पथकाने आरोपी महिलेला अटक केली. या गुन्ह्याचा तपास अवधुतवाडी पोलीस नव्याने करत आहे. त्यामध्ये प्रेमसंबंधातून खून झाल्याचे पुढे आले आहे. दिव्यांग असलेला रामदास हा आकाशवाणी केंद्राजवळ कँटीन चालवित होता. तो आई, वडीलांसह गुरुनानकनगरस्थित घरी राहात होता. डिसेंबर २०१९ मध्ये सुनेचे एका युवकाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय सासूला आला. त्यावरून रामदास व त्याच्या पत्नीत वाद झाला. नंतर हे प्रकरण निवळले. रामदासला आई-वडिलांपासून दूर काढून प्रियकर राहात असलेल्या जामनकरनगर परिसरात भाड्याची खोली केली. तेथे डबा पोहोचविण्याच्या नावाखाली ती महिला प्रियकर अजय शंकर चित्तलवार (२५) रा.भटाळी जि.चंद्रपूर याच्या सतत संपर्कात होती.
अवधुतवाडीचे ठाणेदार आनंद वागदकर यांच्या मार्गदर्शनात फौजदार सुयोग महापुरे, जमादार सतीश चौधरी, नरेंद्र बगमारे, समाधान कांबळे, बबलू चव्हाण यांनी गुन्ह्याचा तपास करत रेकॉर्डवर नसलेल्या प्रियकर अजय चित्तलवार याला अटक केली. त्याच्या कबुलीतून या खुनाच्या घटनेची दुसरी बाजू पुढे आली. त्या महिलेने आपल्या १० व १२ वर्षांच्या मुलांची पर्वा न करता पतीला संपविले. पोलिसांच्या सतर्कतेने या अनैतिक प्रेमसंबंधातून घडलेल्या गुन्ह्याचा भंडाफोड झाला.
नैसर्गिक मृत्यूचा देखावा, अतिसाराच्या गोळ्या
प्रेम बहरात आले असताना रामदास पत्नीला अडचणीचा वाटू लागला. त्याला संपविण्यासाठी व नैसर्गिक मृत्यू दाखविण्यासाठी एक महिन्यापासून अतिसाराच्या गोळ्या दिल्या जात होत्या. यामुळे रामदासची प्रकृती खालावली. मात्र तो जीवानिशी ठार झाल नाही. अखेर कृषी केंद्रातून किटकनाशक खरेदी करून शीतपेयातून ते रामदासला पाजण्यात आले. २१ एप्रिलला विषप्रयोग करून त्याला ठार केले. यावेळी प्रत्येक क्षणाला रामदासची पत्नी प्रियकर अजय चित्तलवार याच्या संपर्कात होती.