महाप्रसादातून विषबाधा; ४० जण रुग्णालयात दाखल; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 02:38 PM2021-08-17T14:38:20+5:302021-08-17T14:55:06+5:30
Yawatmal News आर्णी तालुक्यातील अंजीनाईक या गावी आयोजित पोथीवाचनाच्या कार्यक्रमातील जेवण केल्यानंतर मध्यरात्रीपासून जुलाब व उलटयांच्या त्रासापायी सुमारे ४० नागरिक येथील रुग्णालयात मंगळवारी सकाळी दाखल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: आर्णी तालुक्यातील अंजीनाईक या गावी आयोजित पोथीवाचनाच्या कार्यक्रमातील जेवण केल्यानंतर मध्यरात्रीपासून जुलाब व उलटयांच्या त्रासापायी सुमारे ४० नागरिक येथील रुग्णालयात मंगळवारी सकाळी दाखल झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला यवतमाळला हलवल्याचे कळते.
अंजीनाईक या गावातील रविंद्र धनसिंग राठोड यांच्या घरी १६ ऑगस्ट रोजी दत्त महाराजांच्या पोथीचे वाचन झाले. संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन होते. गावकऱ्यांनी महाप्रसाद खाल्यानंतर त्यांना जुलाब व उलटीचा त्रास सुरू झाला.
मंगळवारी सकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची पाहता पाहता रीघ लागली. सुमारे ४० नागरिकांना येथील रुग्णालयात दाखल केले असून, एक महिला गंभीर झाल्याने तिला यवतमाळला पाठवण्यात आले आहे.
रुग्णांमध्ये लहान मुले, तरुण व वृद्धांचा समावेश आहे.
धनसिंग राठोड